Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 12:16 IST2026-05-16T12:10:05+5:302026-05-16T12:16:17+5:30

Crime News Mumbai: भीमराज शर्मा असे आरोपीचे नाव असून, विकास भुसारे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दोघेही आरे कॉलनीतील युनिट ५ चे मध्ये राहत होते.

Mumbai Crime: Wife's lover invited for a party, got drunk and slit her throat; Suspected of having an immoral relationship, absconding husband arrested | Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक

Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक

मुंबई :  पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने तिच्या कथित प्रियकराला पार्टीच्या बहाण्याने घरी बोलावले. त्याच्यासोबत मद्यप्राशन केले आणि नंतर पत्नीच्या डोळ्यांदेखत गळा चिरून त्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी गोरेगावमधील आरे परिसरात घडली. घटनेनंतर आरे पोलिसांनी तीन तासांतच पतीला गजाआड केले.

भीमराज शर्मा (४८) असे आरोपीचे नाव असून विकास भुसारे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  दोघेही आरे कॉलनीतील युनिट ५ चे रहिवासी होते. पोलिसांनी सांगितले की, भीमराजने याप्रकरणी पत्नीला वारंवार धमकावले होते आणि कथितरीत्या मारहाणही केली होती. मात्र, जेव्हा विकास त्याच्या अनुपस्थितीत घरी येऊ लागला, तेव्हा  भीमराजने त्याच्या हत्येचा कट रचला.

माझ्या घरी का येत असतो म्हणत चिरला गळा

पार्टीदरम्यान स्वत: भीमराज, त्याची पत्नी आणि विकासने रात्री उशिरापर्यंत मद्यपान केले. त्यानंतर नशेतच भीमराजने विकासला तो त्याच्या घरी का येत असतो याचा जाब विचारला. तसेच पुन्हा घरी न येण्याची ताकीदही दिली. यावरून दोघांमध्ये  हाणामारी झाली. त्यामुळे राग अनावर झालेल्या भीमराजने स्वयंपाकघरातील चाकू उचलून विकासचा गळा चिरला. 

हत्येनंतर तो आरेच्या जंगलात पळून गेला. घटनेची माहिती मिळताच, आरे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी रवींद्र पाटील घटनास्थळी दाखल झाले. तीन वेगवेगळी पथके तयार करून शोधमोहीम राबविली. तीन तासांनंतर भीमराजला अटक करण्यात पोलिसांना यश आले.   दरम्यान, बोरिवली न्यायालयाने भीमराजला पोलिस कोठडी सुनावली. 

प्रेम प्रकरणातून महिलेची हत्या; आरोपी गजाआड

भिवंडी : प्रेम प्रकरणात प्रतिसाद देत नसल्याने व मोबाइल उचलत नसल्याच्या रागातून महिलेस घरी बोलावून तिची हत्या केली. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह निर्जनस्थळी नेऊन जाळणाऱ्या  आरोपीच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी गुन्हे शाखेला यश आले. संजय मुकादम उर्फ द्वारकाप्रसाद वर्मा (४२) असे अटक  आरोपीचे नाव आहे. सरितादेवी महतो (३३) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

सरितादेवीचा मृतदेह वर्माने रात्रभर घरीच ठेवला होता. मध्यरात्री मृतदेह पोत्यामध्ये भरून  दुर्गाप्रसाद हॉटेलजवळील मैदानात मोकळ्या जागेत नेऊन  जाळून टाकला. गुन्हे शाखेने यंत्रमाग कारखाना व कामगार वस्तीमध्ये चौकशी करून द्वारकाप्रसादला यंत्रमाग कारखान्यातून ताब्यात घेतले.

 

Web Title : मुंबई: पत्नी के प्रेमी को शराब पिलाकर हत्या, अवैध संबंध का शक

Web Summary : मुंबई: पत्नी के कथित प्रेमी को पार्टी में बुलाकर, शराब पिलाकर पति ने हत्या की, अवैध संबंध का शक था। भिवंडी में, एक व्यक्ति ने महिला को प्रेम प्रस्ताव ठुकराने पर मार डाला और शव जला दिया; दोनों गिरफ्तार।

Web Title : Mumbai Man Kills Wife's Alleged Lover After Booze-Fueled Party

Web Summary : Mumbai: A man murdered his wife's suspected lover after inviting him for a party, fueled by suspicions of infidelity. The husband has been arrested. Separately, in Bhiwandi, a man killed a woman for rejecting his advances and burned the body; he is also in custody.