मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 12:24 IST2026-05-16T12:22:41+5:302026-05-16T12:24:07+5:30

"माझ्या विरोधात बोलण्यासाठी नेत्याने दिले २ कोटी!"; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप

Manoj Jarange Patil Announces Indefinite Hunger Strike from May 30 Over Maratha Reservation | मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा

मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा

आंतरवाली सराटी (जि. जालना): मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा आंदोलनाचे वादळ घोंगावणार आहे. "सरकारकडून वारंवार मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे," असा घणाघाती आरोप करत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ३० मे पासून आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज हजारोंच्या संख्येने सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"माझ्या विरोधात बोलण्यासाठी २ कोटींची सुपारी"
पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. "माझ्या विरोधात बोलण्यासाठी आणि मराठा समाजात फूट पाडण्यासाठी एका मोठ्या नेत्याने एका संघटनेला तब्बल २ कोटी रुपये दिले आहेत," असा आरोप त्यांनी केला. मात्र, या नेत्याचे नाव त्यांनी अद्याप उघड केलेले नाही. हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत शांततेच्या मार्गाने केले जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

काय आहेत प्रमुख मागण्या:
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट करताना सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या आहेत:
१. कुणबी प्रमाणपत्र वाटप: मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचे तातडीने वाटप सुरू करावे.
२. ५८ लाख मराठ्यांना लाभ: ज्या ५८ लाख मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना विनाविलंब प्रमाणपत्रे देण्यात यावीत.
३. सातारा गॅझेट लागू करा: सातारा गॅझेटचा जीआर (शासकीय निर्णय) तात्काळ लागू करण्यात यावा.
४. उपसमिती काही काम करत नाही, केवळ मराठा समाजात भांडण लावत आहे, त्यामुळे उपसमिती बरखास्त करा
५. शिंदे समितीला मुदत वाढ द्या 
६. मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या 

७. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या.

८ . स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा

Web Title : मनोज जरांगे की अनिश्चितकालीन भूख हड़ताल की घोषणा; मराठा आरक्षण आंदोलन तेज।

Web Summary : मनोज जरांगे पाटिल ने 30 मई से अनिश्चितकालीन भूख हड़ताल की घोषणा की, सरकार पर मराठा समुदाय को धोखा देने का आरोप लगाया। उन्होंने मराठवाड़ा के मराठों के लिए कुणबी प्रमाणपत्र, कुणबी रिकॉर्ड वाले 58 लाख लोगों के लिए तत्काल प्रमाणपत्र और सातारा गजेट जीआर के कार्यान्वयन की मांग की। उन्होंने अपने खिलाफ साजिश का भी आरोप लगाया।

Web Title : Manoj Jarange Announces Indefinite Hunger Strike; Maratha Reservation Agitation Intensifies.

Web Summary : Manoj Jarange Patil declared an indefinite hunger strike from May 30th, accusing the government of deceiving the Maratha community. He demands Kunbi certificates for Marathwada's Marathas, immediate certificates for 5.8 million with Kunbi records, and implementation of the Satara Gazette GR. He also alleged a conspiracy against him.