Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी

पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी

मागील आठवड्यात झाली होती घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 13:00 IST2026-05-16T13:00:01+5:302026-05-16T13:00:58+5:30

मागील आठवड्यात झाली होती घसरण

India Forex Reserve Huge increase in foreign exchange reserves after PM Modi's appeal; ₹60,000 crores added to government treasury | पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी

पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी

India Forex Reserve :भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताच्या परकीय चलन साठ्यात ६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, म्हणजेच तब्बल ६० हजार कोटी रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, सलग दोन आठवड्यांच्या घसरणीनंतर हा साठा पुन्हा एकदा वधारला आहे.

पंतप्रधान मोदींच्या आव्हानानंतर मोठी वाढ...

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल आणि सोने-चांदीचा वापर मर्यादित ठेवण्याचे तसेच परदेशी दौरे टाळण्याचे आवाहन केले होते. देशाचा परकीय चलन आणि सोन्याच्या रूपातील खजिना सुरक्षित राहावा, हाच त्यामागील मुख्य हेतू होता. सरकारच्या या धोरणात्मक प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम आता आकडेवारीतून स्पष्टपणे दिसून येत आहे.

मागील आठवड्यात झाली होती घसरण

याआधीच्या आठवड्यात भारताच्या एकूण फॉरेक्स रिझर्वमध्ये ७.७९ अब्ज डॉलरांची घट झाली होती आणि साठा ६९०.६९ अब्ज डॉलरांवर आला होता. मात्र, त्यानंतरच्या आठवड्यात पुन्हा मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, २७ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा विक्रमी ७२८.४९ अब्ज डॉलरांवर पोहोचला होता. त्यानंतर पश्चिम आशियातील तणाव आणि रुपयावर वाढलेल्या दबावामुळे RBI ला डॉलर विकून बाजारात हस्तक्षेप करावा लागला होता. त्यामुळे साठ्यात घट दिसून आली होती.

फॉरेन करन्सी अ‍ॅसेट्समध्ये वाढ

RBI च्या माहितीनुसार, परकीय चलन साठ्यातील सर्वात मोठा घटक असलेल्या Foreign Currency Assets (FCA) मध्येही वाढ झाली आहे. ८ मे रोजी संपलेल्या आठवड्यात FCA मध्ये ५६२ दशलक्ष डॉलरांची वाढ होऊन ती ५५२.३८ अब्ज डॉलरांवर पोहोचली. या FCA मध्ये युरो, पाउंड, येन यांसारख्या नॉन-अमेरिकन चलनांच्या मूल्यातील चढ-उतारांचाही परिणाम समाविष्ट असतो.

सोन्याच्या साठ्यात मोठी वाढ

देशाच्या गोल्ड रिझर्वमध्येही मोठी वाढ झाली आहे. RBI च्या आकडेवारीनुसार, आठवडाभरात सोन्याच्या साठ्याचे मूल्य ५.६३ अब्ज डॉलरांनी वाढून १२०.८५ अब्ज डॉलरांवर गेले आहे. तसेच, विशेष आहरण हक्क (SDR) ८४ दशलक्ष डॉलरांनी वाढून १८.८७ अब्ज डॉलर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे भारताची राखीव स्थितीही १२ दशलक्ष डॉलरांनी वाढून ४.८७ अब्ज डॉलरांवर पोहोचली आहे.

अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत

फॉरेक्स रिझर्वमधील वाढ ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत मानली जात आहे. मजबूत परकीय चलन साठा असल्यास आयात खर्च नियंत्रित ठेवणे, रुपयावरील दबाव कमी करणे आणि जागतिक आर्थिक संकटांचा सामना करणे देशासाठी सोपे होते. RBI कडे पुरेसा डॉलर साठा असल्याने गरज पडल्यास बाजारात हस्तक्षेप करून रुपयाला स्थैर्य देणे शक्य होते.

Web Title : पीएम मोदी की अपील के बाद भारत के विदेशी मुद्रा भंडार में उछाल, ₹60,000 करोड़ की वृद्धि

Web Summary : पीएम मोदी की आयात और विदेश यात्रा सीमित करने की अपील के बाद भारत के विदेशी मुद्रा भंडार में ₹60,000 करोड़ की उल्लेखनीय वृद्धि हुई। दो सप्ताह की गिरावट के बाद यह उछाल अर्थव्यवस्था को बढ़ावा देता है, आयात नियंत्रण और रुपये की स्थिरता में मदद करता है।

Web Title : India's Forex Reserves Surge After PM Modi's Appeal, Up ₹60,000 Crore

Web Summary : India's forex reserves increased significantly by ₹60,000 crore following PM Modi's appeal to limit imports and foreign travel. This surge, after two weeks of decline, boosts the economy, aiding import control and rupee stability due to increased gold reserves and foreign currency assets.