शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 17:34 IST

भारतीय जनता पक्षाच्या दोन खासदारांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कोणत्या प्रकरणामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. 

Nishikant Dubey News: भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवघरमधील स्थानिक पोलिसांनी प्राप्त झालेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा नोंदवला. देवघर येथील वैद्यनाथ धाम मंदिराच्या गाभार्‍यात दोघांनीही जबरदस्ती शिरण्याचा प्रयत्न केला होता. याच प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

देवघर येथील पंडा धर्मरक्षिणी सभेचे माजी महामंत्री कार्तिकनाथ ठाकूर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी झारखंडमधील गोंडाचे खासदार निशिकांत दुबे आणि दिल्लीतील खासदार मनोज तिवारी यांच्याविरोधात एफआरआय नोंदवण्यात आला. 

निशिकांत दुबे, मनोज तिवारींनी मंदिरात काय केलं?

कार्तिकनाथ ठाकूर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, श्रावण महिन्यानिमित्त मंदिरात व्हीव्हीआयपी दर्शन आणि गाभाऱ्यात प्रवेश बंद करण्यात आला आहे. असा निर्णय झालेला असतानाही २ ऑगस्ट रोजी मनोज तिवारी, निशिकांत दुबे, त्यांचा मुलगा कनिष्ककांत दुबे, दोन्ही खासदारांचे पीए आणि देवघरमधील काही भाजप कार्यकर्ते नियम धुडकावून मंदिराच्या गाभाऱ्यात घुसले. 

पोलिसांनाही धक्काबुक्की, जबरदस्ती घुसून पूजा

मंदिराच्या बाहेर पडायच्या दरवाज्यातही ड्युटीवर असलेल्या पोलिसांना त्यांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होऊ शकले असा गोंधळ उडाला होता. त्यादिवशी भाविकांसोबत वाईट घटना घडली असती. खासदारांनी मंदिरात जबरदस्ती प्रवेशच केला नाही, तर आतमध्ये जाऊन पूजाही केली. त्यामुळे मंदिरातील नियमित कामात अडथळा निर्माण झाला होता. 

 रात्री ८.४५ वाजता कांच जल पूजेच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडला. पुरोहितांनी दोन्ही खासदारांना मंदिरात येण्यास मनाई केल्यानंतरही त्यांनी हे सगळं केलं. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता. खासदार निशिकांत दुबे यांनी गोंधळ तयार होईल असे कृत्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :BJPभाजपाMember of parliamentखासदारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली