शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : तुरुंगाच्या क्षमतेहून अधिक कैद्यांची संख्या; सर्वोच्च न्यायालयानं घेतली गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 15:21 IST

Coronavirus : कोर्टाने देशातील तुरूंगात असलेल्या कैद्यांच्या गर्दीमुळे चिंता व्यक्त केली

ठळक मुद्देतुरूंगात क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात कैदी असणे आणि त्यांच्यामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांप्रकरणी सुमोटो दाखल केलाइतकेच नाही तर कोरोना विषाणूमुळे तुरूंगात क्षमता वाढलेल्या कैद्यांच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना जारी करण्याची गरज आहे.

नवी दिल्ली - कोरोना या महामारीमुळे देशाच्या तुरूंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदीअसून त्यातील सुविधा यावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी लक्ष वेधले आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सुमोटो दाखल केला आहे. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे आणि न्या. एल नागेश्वरा राव यांच्या खंडपीठाने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या कारागृह महासंचालक आणि मुख्य सचिवांना नोटिसा बजावल्या आहेत. कोरोना या महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी कोणती पावले उचलली गेली आहेत, हे 20 मार्चपर्यंत सांगण्याचे निर्देश कोर्टाने या सर्वांना दिले आहेत. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोर्टाला मदत करण्यासाठी २३ मार्च रोजी प्रत्येकी एक - एक  अधिकारी नेमण्यास सांगितले आहे.तुरूंगात क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात कैदी असणे आणि त्यांच्यामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांप्रकरणी सुमोटो दाखल केला, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. कोर्टाने देशातील तुरूंगात असलेल्या कैद्यांच्या गर्दीमुळे चिंता व्यक्त केली आणि म्हटले की, तुरुंगात मोठ्या संख्येने कैदी एकाच ठिकाणी आहेत आणि कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचे हे मोठे कारण असू शकते. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ही परिस्थिती लक्षात घेता आम्हाला काही मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी लागतील. इतकेच नाही तर कोरोना विषाणूमुळे तुरूंगात क्षमता वाढलेल्या कैद्यांच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना जारी करण्याची गरज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी पावले उचलली आहेत पण काही राज्ये अशी आहेत ज्यांनी योग्य उपाययोजना केल्या नाहीत.

टॅग्स :corona virusकोरोनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयjailतुरुंगPrisonतुरुंग