शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

CoronaVirus : राहुल गांधी, थरूर, अँटोनींनी दिले प्रत्येकी २.६६ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 3:03 AM

Coronavirus : गांधी, थरूर व अँटोनी हे केरळचे अनुक्रमे लोकसभा व राज्यसभेचे सदस्य आहेत.

थिरुवनंतपुरम : काँग्रेसचे नेते राहुल गांधी, ए. के. अँटोनी आणि शशी थरूर यांनी आपापल्या मतदारसंघांत कोरोना विषाणूविरुद्ध (कोविड-१९) लढण्यासाठी खासदारांना मिळणाऱ्या स्थानिक भाग विकास निधी योजनेतील (एमपीएलएडीएस) पैसा उपलब्ध केला आहे.गांधी, थरूर व अँटोनी हे केरळचे अनुक्रमे लोकसभा व राज्यसभेचे सदस्य आहेत. राहुल गांधी यांनी २.६६ कोटी आपल्या वायनाड, थरूर यांनी २.६६ कोटी थिरुवनंतपुरम, तर ए. के. अँटोनी यांनी त्यांच्या अलाप्पुझा जिल्ह्यासाठी २.६६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या योजनेंतर्गत लोकप्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या मतदारसंघात कोणत्या प्रकल्पावर निधी खर्च करायचा याची शिफारस करू शकतात. केरळमधील इतर लोकप्रतिनिधीही या योजनेंतर्गत राज्यात कोरोना विषाणूशी लढण्यासाठी निधी मंजूर करतील, असे समजते.केरळमध्ये ७८ हजारांपेक्षा जास्त जणांना सध्या कोरोनाची संशयित लक्षणे आहेत, म्हणून एक तर घरात किंवा रुग्णालयांत क्वारंटाईन केले गेलेले आहेत.केरळमध्ये ११८ लोक कोरोना विषाणूच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत.तत्पूर्वी, आधल्या दिवशी शशी थरूर यांनी टिष्ट्वटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेल्या आवाहनात म्हटले होते की, ‘‘नव्या पार्लमेंट इमारतीसाठी काढून ठेवलेले २० हजार कोटी आणि सेंट्रल व्हिस्टासाठीचे १५ हजार कोटी रुपये कोविड-१९ शी लढण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत. याचा अर्थ प्रत्येक जिल्ह्यासाठी केवळ २० कोटी रुपये असतील. अतिभव्य इमारतींवर आजच्या परिस्थितीत एवढा खर्च करणे ही लांबणीवर टाकता येईल अशी चैन आहे.’’

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या