शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाने घेतला आमदाराचा बळी, वाढदिवसाच्या दिवशीच झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 11:19 AM

CoronaVirus News : जे. अनबालागन यांच्यावर येथील रेला इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सेंटर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती रविवारी अचानक खालावली होती.

ठळक मुद्देडीएमकेचे आमदार जे. अनबालागन यांचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला.  जे. अनबालागन यांचा आजच 62वा वाढदिवस होता.

चेन्नई : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9985 नवीन रुग्ण आढळले असून 279 जणांचा मृत्यू झाला आहे. यातच कोरोनामुळे एका आमदाराचा मृत्यू झाला आहे. 

डीएमकेचे आमदार जे. अनबालागन यांचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. जे. अनबालागन यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपाचर सुरू होते.  जे. अनबालागन यांचा आजच 62वा वाढदिवस होता.

जे. अनबालागन यांच्यावर येथील रेला इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सेंटर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती रविवारी अचानक खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, कोरोना संकट काळात लोकांना मदत करण्यासाठी आमदार जे. अनबालागन यांनी पुढाकार घेतला होता. तसेच, त्यांनी पक्षाच्या 'ओंदरीनाओव्हॉम कॅम्पेआग्न' (Ondrinaivom Campaiagn) मध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. कोरोनामुळे एखाद्या आमदाराच्या मृत्यूची ही पहिलीच घटना आहे. 

तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलीन यांनी जे. अनबालागन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. जे. अनबालागन हे चेन्नई पश्चिम जिल्ह्यात द्रमुक सचिव होते. तसेच, जे. अनबालागन हे द्रविड मुन्नेत्र कड़गम (DMK) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. टी नगर मतदार संघातून ते तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

आणखी बातम्या...

CoronaVirus in Thane नगरसेवक मुकुंद केणी यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारावेळी निधन

चिनी सैन्याची माघार, पण जिनपिंग यांचा स्टार कमांडर सीमेवर तैनात

Jammu and Kashmir : सुरक्षा दलांना मोठं यश, शोपियान जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमMLAआमदारTamilnaduतामिळनाडू