शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: लस शोधली तरी कोरोना कायम राहण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 06:12 IST

कोरोनाच्या आजारावर प्रतिबंधक लस शोधण्यासाठी अमेरिका, भारतापासून अनेक देशांकडून प्रयत्न सुरू आहेत.

वॉशिंग्टन : कोविड-१९ विषाणूवर जरी प्रतिबंधक लस शोधून काढण्यात यश आले तरी कोरोनाचा आजार आणखी अनेक वर्षे कायम राहाण्याची शक्यता आहे. एचआयव्ही, कांजिण्या, गोवर यासारखा कोरोनाचा आजारही भविष्यात विशिष्ट भागांमध्ये उद्भवत राहिल, असे अमेरिकेतील संसर्गजन्य रोग या विषयातील तज्ज्ञांचे मत आहे.

या तज्ज्ञांनी म्हटले आहे की, अमेरिकेमध्ये पसरलेली कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी आता कोणते उपाय योजले जातात, हे महत्त्वाचे आहे. आतापर्यंत जगात कोरोनाचे चार प्रकारचे विषाणू अस्तित्वात होते. ज्यांच्या संसर्गामुळे ताप, सर्दी, खोकला अशी सामायिक लक्षणे आढळून यायची.  आता त्यात कोविड-१९ या कोरोनाच्या पाचव्या प्रकारच्या विषाणूची भर पडली आहे.या संदर्भात शिकागो विद्यापीठातील विषाणूतज्ज्ञ सारा कोबे यांनी सांगितले की, कोविड-१९ विषाणू हा अस्तित्वात राहणार असून, ते गृहित धरूनच लोकांनी आता जगायला शिकले पाहिजे.

संसर्गजन्य रोगांशी मुकाबला करण्यासाठी ठोस उपाययोजना तसेच राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे असे या तज्ज्ञांचे मत आहे. सेंटर फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेेंशन या संस्थेचे माजी संचालक टॉम फ्रिडेन यांनी सांगितले की, जगभरात पसरणाऱ्या संसर्गजन्य साथींमुळे काय हानी होते याचा अनेक देशांना यापूर्वी फारसा अनुभव आला नव्हता. कोरोनाच्या आजारावर प्रतिबंधक लस शोधण्यासाठी अमेरिका, भारतापासून अनेक देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. हा आजार झाल्यानंतर त्याला प्रतिबंध करण्यासाठी शरीरामध्ये तशी प्रतिकारक शक्ती निर्माण होते. पण ही मोठी प्रक्रिया आहे असेही विषाणूतज्ज्ञांनी सांगितले.

दूरदृष्टीचा अभाव

कोरोनाची साथ असूनही काही देशांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये कोणतीही दूरदृष्टीचा विचार नाही. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या