शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Coronavirus : तरुणांपेक्षा वृद्ध रुग्णांच्या जीवाला अधिक धोका; कोरोनामुळे श्वसनसंस्थेतील एन्झाइमच्या स्वरूपात होतात बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 1:30 AM

coronavirus : अमेरिकेतील लुईसिआना विद्यापीठातील संशोधक जेम्स दिआज यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा विषाणू श्वसनसंस्थेतील एन्झाइमचे स्वरूप बदलून फुप्फुसात प्रवेश करतो.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांमध्ये तरुणांपेक्षा वृद्धांच्या जीवाला अधिक धोका का संभवतो, याचे उत्तर शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे.कोरोना विषाणू श्वसनसंस्थेतील एन्झाइमचे स्वरूप बदलत असल्यामुळे फुप्फुसांच्या क्रियेतही गुंतागुंत होते. त्यामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, मुत्रपिंडाचे गंभीर आजार असलेल्या आणि ६० वर्षे वयापुढील व्यक्तींसाठी कोरोना संसर्ग जीवघेणा ठरतो असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.ट्रॅव्हल मेडिसिन या नियतकालिकामध्ये संशोधकांनी एक लेख लिहिला आहे. अमेरिकेतील लुईसिआना विद्यापीठातील संशोधक जेम्स दिआज यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा विषाणू श्वसनसंस्थेतील एन्झाइमचे स्वरूप बदलून फुप्फुसात प्रवेश करतो. त्यामुळे त्या रुग्णाला न्यूमोनिया होतो. त्यामुळे श्वसनक्रियेत मोठा बिघाड होतो.अशा रुग्णाचा कोरोना संसर्ग झाल्यापासून १० ते १४ दिवसांत मृत्यू ओढवू शकतो. हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेहासारखे विकार असलेल्यांना अँजिओटेन्सिन-कन्व्हर्टिंग एन्झाईम इनहिबिटर्स (एसीईआय), अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स (एआरबी) पद्धतीची औषधे रोज घ्यावी लागतात. अशा रुग्णांच्या फुप्फुसांमध्ये एसीई२च्या रिसेप्टरची संख्या वाढलेली असते. कोरोना विषाणूची बाधा होताच अशा व्यक्तींच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होऊन ती दगावण्याचा धोका असतो.चीनमधील उदाहरणेचीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्यांपैकी १०९९ जणांची ११ डिसेंबर २०१९ ते २९ जानेवारी २०२० या काळात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. विषाणूची लागण झालेल्यांपैकी जे मरण पावले, त्यामध्ये वृद्धांची संख्या मोठी आहे. त्यामुळे १० वर्षांखालील मुले व ६० वर्षांवरील वृद्धांनी महत्त्वाचे काम नसल्यास शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटना व विविध देशांच्या सरकारे करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या