शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

Coronavirus : अनुकरणीय! 'या' केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबीयांनी गरजूंसाठी घरीच शिवले मास्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 7:01 PM

Coronavirus : केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये जनतेला गरजूंसाठी आणि स्वत:साठी घरातच मास्क शिवण्याचे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून ती 5000 वर पोहोचली आहे. तर 150 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. तसेच डॉक्टरही आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करत आहे. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी एका केंद्रीय मंत्र्यांच्या संपूर्ण कुटुंबाने मदतीचा हात दिला आहे.

केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये जनतेला गरजूंसाठी आणि स्वत:साठी घरातच मास्क शिवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कुटुंबीयांनीही गरजूंसाठी घरातच मास्क तयार करण्याची सुरुवात केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्यांची पत्नी आणि मुलगी मशिनने मास्क शिवत असल्याचं दिसत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.

'या कठीण काळात आपण सर्वांनी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मला माझी पत्नी मृदुला आणि मुलगी नैमिषाचा अभिमान आहे. त्या आमच्या सर्वांसाठी आणि गरजूंसाठी मास्क तयार करत आहेत. आपली कौशल्ये सुधारण्यासाठी आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी यापेक्षा चांगला काळ नाही' असं ट्वीट धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी  काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या पत्नीनेही मास्क शिवले होते. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 82,156 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 14,34,825 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 3,02,468 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 

कोरोनाग्रस्तांवर उपचार करता यावेत यासाठी अनेक जण काही दिवसांपासून आपल्या कुटुंबापासून लांब आहेत. रुग्णांची सेवा करताना त्यांनी स्वत: ला झोकून दिले आहे. मध्य प्रदेशमधील एका डॉक्टरने कुटुंबाला कोरोनाचा संसर्गापासून रोखण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून आपल्या गाडीमध्येत घर केलं आहे. सचिन नायक असं या डॉक्टरचं नाव असून ते भोपाळच्या जेपी रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. पत्नी आणि मुलाला संसर्ग होऊ नये यासाठी ते गेल्या 7 दिवसांपासून गाडीतच राहत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनाचे थैमान! न्यूयॉर्कमध्ये एका दिवसात तब्बल 731 जणांचा मृत्यू

Coronavirus : संपूर्ण जगासाठी 'संजीवनी' ठरणारं हे औषधं नेमकं कोण कोण तयार करतंय?

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी ट्विटरच्या सीईओची मोठी घोषणा

Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 82,156 जणांचा मृत्यू; इटली, स्पेनमध्ये परिस्थिती गंभीर

Coronavirus : बापरे! लॉकडाऊनमध्ये दुधाच्या कॅनमधून नेत होता दारुच्या बाटल्या अन्

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdelhiदिल्लीDeathमृत्यू