Coronavirus trump is waiting for hydroxychloroquine for corona hit SSS | Coronavirus : संपूर्ण जगासाठी 'संजीवनी' ठरणारं हे औषधं नेमकं कोण कोण तयार करतंय?

Coronavirus : संपूर्ण जगासाठी 'संजीवनी' ठरणारं हे औषधं नेमकं कोण कोण तयार करतंय?

नवी दिल्ली - संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे चिंतेत आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करणाऱ्या अमेरिकेने भारताची मदत मागितली आहे. त्यासाठी अमेरिकेने भारताला धमकीवजा इशाराही दिला आहे.  हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधासाठी ट्रम्प आग्रही आहेत. केंद्र सरकारने पॅरासिटामोल आणि हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. कोरोनावरील उपचार करण्यात या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. 

कोरोनाशी लढण्यासाठी ज्या देशांना या गोळ्यांची आवश्यकता असेल त्यांच्या मागण्यांची पूर्तता केली जाईल असे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे या गोळ्या तयार करणाऱ्या कंपन्यांनीही निर्मिती कित्येक पटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टर आणि तज्ञांमध्ये मलेरियासाठी वापरली जाणारी ही गोळी कोरोनासाठी किती प्रभावी आहे याबाबत मतभेद आहेत. मात्र आता केंद्र सरकारने इतर देशांच्या मागणीची पूर्तता करण्याचे संकेत दिल्यानंतर भारतीय कंपन्यांनी निर्मिती ही 6 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

देशात अनेक कंपन्या या गोळ्यांची निर्मिती करतात. जायडस कॅडिला आणि इप्का लॅबोरेटरिज यामध्ये प्रमुख आहेत. या कंपन्या मासिक निर्मिती 4 टक्क्यांनी वाढवून 40 मेट्रिक टन करण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढच्या महिन्यात हा दर 5 ते 6 टक्क्यांनी वाढणार असून निर्मिती 70 मेट्रिक टन केली जाणार आहे. या कंपन्यांनी पूर्ण क्षमतेने निर्मिती केल्यास प्रत्येक महिन्याला 200 एमजीच्या 35 कोटी टॅबलेट तयार केल्या जाऊ शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतात एचसीक्यूच्या एका गोळीची किंमत 3 रुपयांपेक्षा कमी आहे. 7 कोटी रुग्णांवर उपचार करण्यासाठी 10 कोटी गोळ्या पुरेशा आहेत अशी माहिती काही तज्ञांनी दिली आहे. या परिस्थितीत इतर गोळ्यांची निर्यात केली जाऊ शकते. शेजारी राष्ट्रांसह या औषधाची आवश्यकता असलेल्या इतर देशांनाही औषध दिलं जाणार आहे. भाआतापर्यंत 150 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 5000 हून अधिक  झाली आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 82,156 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 14,34,825 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 3,02,468 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी ट्विटरच्या सीईओची मोठी घोषणा

Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 82,156 जणांचा मृत्यू; इटली, स्पेनमध्ये परिस्थिती गंभीर

Coronavirus : बापरे! लॉकडाऊनमध्ये दुधाच्या कॅनमधून नेत होता दारुच्या बाटल्या अन्

CoronaVirus : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५१४९वर पोहोचली, १४९ जणांचा मृत्यू

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus trump is waiting for hydroxychloroquine for corona hit SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.