Coronavirus : कोरोनाचे थैमान! न्यूयॉर्कमध्ये एका दिवसात तब्बल 731 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 05:10 PM2020-04-08T17:10:50+5:302020-04-08T17:21:56+5:30

Coronavirus : अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा चार लाखांहून अधिक झाला आहे.

Coronavirus america new york reports 731 death in one day SSS | Coronavirus : कोरोनाचे थैमान! न्यूयॉर्कमध्ये एका दिवसात तब्बल 731 जणांचा मृत्यू

Coronavirus : कोरोनाचे थैमान! न्यूयॉर्कमध्ये एका दिवसात तब्बल 731 जणांचा मृत्यू

googlenewsNext

न्यूयॉर्क - वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 82,156 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 14,34,825 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 3,02,468 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा चार लाखांहून अधिक झाला आहे. याच दरम्यान अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका दिवसात तब्बल 731 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

न्यूयॉर्कमध्ये मंगळवारी (7 एप्रिल) 24 तासांत 731 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, अमेरिकेत दोन हजारांहून अधिक जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा सर्वात जास्त संसर्ग झाला आहे. मृतांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. न्यूयॉर्कचे राज्यपाल एंड्रयू क्युमो यांनी न्यूयॉर्कमध्ये 5489 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका दिवसात 731 जणांचा मृत्यू झाला असून हा दिवस दु:खद असल्याचे सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

न्यूयॉर्कमध्ये कोरोनामुळे मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळेच शवगरात मृतदेह ठेवण्यास जागा कमी पडत आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. इटलीत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इटलीत 17,127 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 135,586 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.

इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असून स्पेनमधील एकूण मृत्यूची संख्या 14,045 वर गेली आहे. कोरोनामुळे  चीनमध्ये 3,333, अमेरिकेत 12,857, स्पेनमध्ये 14,045, इराणमध्ये 3,872, फ्रान्समध्ये 10,328, जर्मनीमध्ये 2,016 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे रोज होणाऱ्या मृत्यूचा आकडा पुन्हा एकदा वाढला असून मंगळवारी तेथे तब्बल 743 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येथे कोरोनामुळे मरणाऱ्यांचा आकडा आता 14,045 वर पोहोचला आहे. या देशात कोरोनाने असे रुप धारण केले आहे, की जिकडे-तिकडे केवळ मृतांचा ढीग दिसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : संपूर्ण जगासाठी 'संजीवनी' ठरणारं हे औषधं नेमकं कोण कोण तयार करतंय?

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी ट्विटरच्या सीईओची मोठी घोषणा

Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 82,156 जणांचा मृत्यू; इटली, स्पेनमध्ये परिस्थिती गंभीर

Coronavirus : बापरे! लॉकडाऊनमध्ये दुधाच्या कॅनमधून नेत होता दारुच्या बाटल्या अन्

 

Web Title: Coronavirus america new york reports 731 death in one day SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.