Sachin Pilot vs Ashok Gehlot : प्रेशर पॉलिटिक्स फेल; आता नाराज सचिन पायलटांना काँग्रेसनं दिली फायनल ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 11:58 PM2021-06-16T23:58:44+5:302021-06-17T00:00:43+5:30

गेल्या 6 दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकूण असलेल्या पायलटांना काँग्रेस हाय कमानला न भेटताच राजस्थानला परतावे लागले आहे...

Congress leader Sachin Pilot vs Ashok Gehlot congress final offer three minister general secretary in charge seat | Sachin Pilot vs Ashok Gehlot : प्रेशर पॉलिटिक्स फेल; आता नाराज सचिन पायलटांना काँग्रेसनं दिली फायनल ऑफर

Sachin Pilot vs Ashok Gehlot : प्रेशर पॉलिटिक्स फेल; आता नाराज सचिन पायलटांना काँग्रेसनं दिली फायनल ऑफर

Next

नवी दिल्ली - राजस्थानातसचिन पायलट (Sachin Pilot) विरुद्ध अशोक गेहलोत (Ashok Gehlot) असा संघर्ष सुरू आहे. यातच आता काँग्रेसनेसचिन पायलट यांना फायनल ऑफर दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाराज पायलटांची मनधरणी करण्यासाठी पक्षाने त्यांच्या समर्थकांना राजस्थान कॅबिनेटमध्ये 3 मंत्रिपदांसह त्यांना सरचिटणीस आणि राज्याचे प्रभारी करण्यात येईल, अशी ऑफर दिली आहे. आता चेंडू सचिन पायलट यांच्या कोर्टात आहे. (Congress leader Sachin Pilot vs Ashok Gehlot congress final offer three minister general secretary in charge seat)

गेल्या 6 दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकूण असलेल्या पायलटांना काँग्रेस हाय कमानला न भेटताच राजस्थानला परतावे लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलट समर्थक 3 आमदारांना मंत्रिमंडळात स्थान आणि महानगरपालिका अथवा बोर्डावर योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल. मात्र, महानगरपालिका आणि बोर्डांसंदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारची संख्या निश्चित होऊ शकलेली नाही. मात्र, 5 से 6 मंत्री पदे मिळावीत, अशी सचिन पायलट यांची इच्छा आहे. यासंदर्भात न्यूज १८ ने वृत्त दिले आहे.

सचिन पायलट 6 दिवस दिल्लीत थांबले, ना राहुल भेटले ना प्रियंकां गांधींची भेट झाली

पक्ष आणि अशोक गेहलोत यांच्यानुसार, 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. यात बीएसपीचे 6 आमदार आणि जवळपास एक डझनहून अधिक अपक्ष आमदारांपैकी काहींना मंत्री करायचे आहे. पक्ष सचिन यांना सरचिटणीस करून एखाद्या महत्वाच्या राज्याचे प्रभारी करण्यास तयार आहे. एवढेच नाही, तर सचिन पायलट सहमत झाल्यास लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही पक्षाने म्हटले आहे. या शिवाय, राजस्थानात सध्या अशोक गेहलोत हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार काम करेल. तसेच सचिन हे पक्षाचे भविष्य आहेत. मात्र, त्यांना गेहलोत यांच्यासोबत समन्वयाने पुढे चालावे लागेल. 

गतवर्षी वरिष्ठांनी मिटवला होता वाद
गेल्या वर्षी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत सचिन पायलट यांचे मतभेद झाले होते. मात्र, काँग्रेस श्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर पायलट यांनी माघार घेतली होती. यावेळी सरकारमध्ये सचिन पायलट यांची भागीदारी वाढविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पायलट गटातील आमदारांना मंत्री अथवा राज्यातील कुण्या बोर्डाचे सदस्यत्व अथवा चेअरमन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावेळी, पक्षातील कलह संपवण्यासाठी, अशा प्रकारे मार्ग काढण्यात आला असला तरी वाद अद्यापही संपलेला नाही.

नवज्योतसिंग सिद्धू अन् सचिन पायलट यांना जबाबदाऱ्या देण्याबाबत पक्षश्रेष्ठी द्विधा मन:स्थितीत

Web Title: Congress leader Sachin Pilot vs Ashok Gehlot congress final offer three minister general secretary in charge seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.