सचिन पायलट 6 दिवस दिल्लीत थांबले, ना राहुल भेटले ना प्रियंकां गांधींची भेट झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 05:17 PM2021-06-16T17:17:47+5:302021-06-16T17:19:49+5:30

देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस सध्या अनेक संकटांचा सामना करत आहे. जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडली. नवोजत सिंग सिद्धू आणि सचिन पायलट नाराज आहेत.

Sachin Pilot stayed in Delhi for 6 days, but did not meet Rahul Gandhi | सचिन पायलट 6 दिवस दिल्लीत थांबले, ना राहुल भेटले ना प्रियंकां गांधींची भेट झाली

सचिन पायलट 6 दिवस दिल्लीत थांबले, ना राहुल भेटले ना प्रियंकां गांधींची भेट झाली

googlenewsNext
ठळक मुद्देदेशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस सध्या अनेक संकटांचा सामना करत आहे. जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडली. नवोजत सिंग सिद्धू आणि सचिन पायलट नाराज आहेत

नवी दिल्ली - राजस्थानात राजकीय हालचालींना वेग आला आहे. येथे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट नाराज आहेत. काँग्रेस हायकमानकडून सचिन पायलट यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी रात्री उशिरा सचिन पायलट यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त होते. मात्र, दुसरीकडे सचिन पायलट दिल्लीत जाऊन आले, पण त्यांना काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी भेट दिली नसल्याचे समोर आले आहे. 

देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस सध्या अनेक संकटांचा सामना करत आहे. जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडली. नवोजत सिंग सिद्धू आणि सचिन पायलट नाराज आहेत. काँग्रेसमध्ये चिंतन आणि मंथन सुरू आहे. सध्या, सचिन पायलट मौन आहेत. मात्र, त्यांच्या मौन असण्यामागचे कारण त्यांची नाराजी आहे आणि नाराजीमागे ती आश्वासनं आहेत जी अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर सचिन पायलट हे दिल्ली दरबारी गेले होते. मात्र, हायकमांडच्या भेटीशिवाय त्यांना परत फिरावे लागले आहे. 

राज्यातील राजकारणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी सचिन पायलट दिल्लीत आले होते. मात्र, 6 दिवस दिल्लीत राहूनही काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांना भेट दिली नाही. त्यामुळे, नाराज होऊन त्यांन परत फिरावे लागले आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये अशोक गेहलोत हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसच सरकार काम करेल, असा संदेशही सचिन यांना देण्यात आला आहे. सचिन हे भविष्यातील मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांना भविष्यात मोठी संधी असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 

गतवर्षी वरिष्ठांनी मिटवला होता वाद

गेल्या वर्षी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत सचिन पायलट यांचे मतभेद झाले होते. मात्र, काँग्रेस श्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर पायलट यांनी माघार घेतली होती. यावेळी सरकारमध्ये सचिन पायलट यांची भागीदारी वाढविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पायलट गटातील आमदारांना मंत्री अथवा राज्यातील कुण्या बोर्डाचे सदस्यत्व अथवा चेअरमन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावेळी, पक्षातील कलह संपवण्यासाठी, अशा प्रकारे मार्ग काढण्यात आला असला तरी वाद अद्यापही संपलेला नाही.

मी काँग्रेसमध्येच राहणार

राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रसाद यांनी पक्षाला रामराम केल्यानं उत्तर प्रदेशात आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेसच्या समस्यांमध्ये भर पडली आहे. त्यातच आता राजस्थानातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटदेखील पक्षाला रामराम करणार असल्याची चर्चा सुरू होती. याबाबत, स्वत: सचिन पायलट यांनी उत्तर दिलं होतं. मी काँग्रेसमध्ये होतो, मी काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं सचिन पायलट स्पष्ट केलं होतं. 
 

Web Title: Sachin Pilot stayed in Delhi for 6 days, but did not meet Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.