शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 10:58 IST

Chandrashakhar Azad News: उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावर लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक शोषण केल्याचे गंभीर आरोप झाले आहेत.

MP Chandrashakhar Azad News: उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आझाद समाज(कांशीराम)पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्यावर पीएसडी स्कॉलर डॉ. रोहिणी घावारी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. दरम्यान, आता रोहिणी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या तक्रारीबाबत पत्र लिहिले असून, न्यायाची मागणी केली आहे.

चंद्रशेखर यांच्यावर आरोप करताना रोहिणी घावारी यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, 'भारताची कन्या असल्याने मी नेहमीच जागतिक स्तरावर माझ्या देशाचा सन्मान वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आता न्याय आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे. मला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. मी माझी तक्रार राष्ट्रीय महिला आयोग आणि दिल्ली पोलिसांकडे केली आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.'

'या घटनेने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले असून, समाजातील लोक माझाच अपमान करत आहेत. दीर्घकाळ भीती आणि नैराश्यात राहिल्यानंतर आता माझ्यात न्याय आणि सन्मानासाठी लढण्याची हिंमत आली आहे. ही लढाई लाखो महिलांच्या स्वाभिमानासाठी आहे. ही कसली व्यवस्था, जिथे स्त्रीचा अपमान करण्यासाठी ठेवलेली, वेश्या असे शब्द वापरले जातात, पण दोषी पुरुषाला शिक्षा होत नाही. पंतप्रधान म्हणून मी तुम्हाला मला न्याय मिळवून देण्याची विनंती करते. मी सर्वत्र तक्रार पाठवली आहे. माझा माझ्या देशाच्या कायद्यावर पूर्ण विश्वास आहे,' असे तिने या पत्रात म्हटले आहे.

पोलिस आणि महिला आयोगाकडेही तक्रार 
या संदर्भात रोहिणी घावरी यांनी पोलिस आणि महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. ज्यामध्ये त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यावर संमतीशिवाय जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा, लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा, विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि खाजगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :Chandrashekhar Azadचंद्रशेखर आझादNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशWomenमहिलाMolestationविनयभंग