शहरं
Join us  
Trending Stories
1
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
2
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
4
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
5
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
6
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
7
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
8
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
9
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
10
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
11
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
12
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
13
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
14
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
15
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
16
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
17
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
18
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
19
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
20
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

सूरत हादरलं! भीषण आगीनंतर गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू, ९ जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:16 IST

एका इमारतीला आग लागल्याने आणि सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. या आगीत इमारतीत राहणारे ९ लोक जखमी झाले आहेत.

गुजरातच्या सूरत शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीला आग लागल्याने आणि सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. या आगीत इमारतीत राहणारे ९ लोक जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सूरतच्या भरतनगर भागात ही घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास कापोद्रा येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. ही आग पसरत किचनपर्यंत पोहोचली आणि तिथे ठेवलेल्या सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ९ जण गंभीररित्या भाजले आहेत.

या घटनेची माहिती देताना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, इमारतीमध्ये एकूण आठ गॅस सिलिंडर ठेवलेले होते. त्यापैकी दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चार अग्निशमन केंद्रांतून गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच एका एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला होता, ज्यामुळे आग अधिकच भडकली. यामध्ये ९ जण जखमी झाले आहेत.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तिसऱ्या मजल्यावरील पत्रे तोडून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात पाठवलं. या संपूर्ण दुर्घटनेत इमारतीत अडकलेल्या एकूण ११ जणांना बाहेर काढण्यात यश आलं, ज्यापैकी ९ जण जखमी असून २ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :SuratसूरतfireआगDeathमृत्यू