शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

लडाखमधील निवडणुकीत भाजपाची जोरदार मुसंडी, काँग्रेसला धोबीपछाड

By बाळकृष्ण परब | Updated: October 27, 2020 07:53 IST

BJP News : लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

ठळक मुद्देएकूण २६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने १५ जागांवर विजय मिळवला काँग्रेसला ९ आणि अपक्षांना दोन जागांवर समाधान मानावे लागलेया निवडणुकीत एकूण ५४ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता

लेह - सहाव्या लडाख पर्वतीय विकास परिषद लेह निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला आहे. एकूण २६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने १५ जागांवर विजय मिळवत निर्विवाद यश प्राप्त केले आहे. तर काँग्रेसला ९ आणि अपक्षांना दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यापूर्वी या निवडणुकीवर अनेक पक्षांनी बहिष्कार घातला होता. मात्र नंतर एका शिष्टमंडळाने गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि नंतर निवडणुकीचा मार्ग मोकळाझाला होता.पर्वतीय परिषदेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांचा ईव्हीएमचा वापर झाला. तसेच २३ ऑक्टोबर रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. एकूण ५४ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसने सर्वा २६ जागांवर उमेदवार उतरवले होते. तर आम आदमी पक्षाने १९ उमेदवार दिले होते. तसेच २३ अपक्ष उमेदवारसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते. 

दरम्यान, या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षावर विश्वास दर्शवल्याबद्दल लडाखमधील जनतेचे आभार मानले आहेत. त्यांनी हा विजय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. भाजपा नेते राम माधव यांनीही या विजयासाठी भाजपाच्या लडाखमधील पथकाचे अभिनंदन केले आहे.कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश घोषित झाल्यानंतर या भागात पहिल्यांदाच लेह विकास परिषदेची निवडणूक होत होती. त्यामुळे भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. २०१५ मध्ये झालेल्या या परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला २६ पैकी १८ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी भाजपाला सत्ता मिळते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

टॅग्स :ladakhलडाखBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक