शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 15:37 IST

हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत.

BJP News : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या वर्षी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरचा समावेश आहे. दरम्यान, भाजप हायकमांडने या चार राज्यांसाठी नवीन निवडणूक प्रभारी आणि सह-प्रभारी नियुक्त केले आहेत. भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवले आहे, तर अश्विनी वैष्णव सहप्रभारी म्हणून काम पाहतील.

दुसरीकडे, हरियाणामध्ये धर्मेंद्र प्रधान यांना प्रभारी बनवण्यात आले आहे, तर विपलव कुमार देव सहप्रभारी असतील. तसेच शिवराज सिंह चौहान झारखंडचे प्रभारी असतील. त्यांच्या मदतीला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि सहप्रभारी म्हून काम पाहतील. यासोबतच जी किशन रेड्डी यांना जम्मू-काश्मीरचे प्रभारी बनवण्यात आले आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपूर्वी निवडणुकीची शक्यताजम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी 30 सप्टेंबरपूर्वी मतदान होण्याची शक्यता आहे. यानंतर उर्वरित तीन राज्यांमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप सर्व 90 जागांवर उमेदवार उभे करू शकते. येथे शेवटची विधानसभा निवडणूक 2024 मध्ये झाली होती. भाजप आणि पीडीपीचे युतीचे सरकार स्थापन झाले, पण हे सरकार जून 2018 मध्ये पडले.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झारखंड-महाराष्ट्र-हरियाणामध्ये निवडणुकाझारखंड, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. या तीन राज्यांच्या सद्यस्थितीबद्दल बोलायचे झाले, तर हरियाणामध्ये भाजपचे सरकार आहे. नायबसिंग सैनी हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीतील उत्कृष्ट कामगिरीमुळे यावेळी काँग्रेसचेही मनोबल उंचावले आहे. त्यांनी हरियाणात सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 5 जागा गमावल्या तर काँग्रेसने 5 जागा जिंकल्या. 2019 मध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही.

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचे युतीचे सरकार आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री चंपाई सोरेन आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांना भाजप, आणि अजित पवार गटाची साथ आहे. 

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक 2024Maharashtraमहाराष्ट्रJharkhandझारखंडHaryanaहरयाणाJammu Kashmirजम्मू-काश्मीर