शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का! केरळमध्ये खळबळ, अधिकारी तडकाफडकी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:17 IST

केरळमध्ये निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का आढळल्याने खळबळ उडाली.

Kerala Assembly Election 2026: देशात पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमधील विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु असतानाच, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका अधिकृत पत्राने नवा वाद निर्माण केला आहे. निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांना पाठवण्यात आलेल्या एका अधिकृत पत्रावर चक्क भाजप केरळ युनिटचा शिक्का आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, आयोगाला भाजपची बी-टीम म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

केरळमध्ये ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झाले. १९ मार्च २०१९ च्या एका पत्रासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर निवडणूक आयोगाच्या अधिकृत शिक्क्याऐवजी भारतीय जनता पार्टी, केरळ असा शिक्का मारलेला दिसला. हे पत्र समोर येताच सीपीआय(ए) ने सोशल मीडियावरुन आयोगावर हल्लाबोल केला. भाजप आणि निवडणूक आयोग आता एकाच टेबलावरून काम करत आहेत का? असा बोचरा सवाल डाव्या पक्षांनी विचारला आहे.

विरोधकांचा तुफान हल्ला

या प्रकरणावरून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आयोगाला घेरले आहे. "आम्ही ऐकलं होतं की मतदान यंत्रावर कोणतंही बटण दाबलं की कमळाला मतदान होतं, पण निवडणूक आयोग आणि भाजप एकच शिक्का वापरत असल्याचे पहिल्यांदाच पाहत आहोत," अशी टीका डाव्या पक्षाने केली. तर निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतोय का? तुमच्या लेटरहेडवर भाजपचा शिक्का येतोच कसा? असा सवाल काँग्रेसने केला. तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी, "आयोगाने आता स्वतःच अधिकृतपणे कबूल केले आहे की ते भाजपची बी-टीम आहेत," अशी टीका केली.

निवडणूक आयोगाचा बचाव

वाढता वाद पाहून केरळच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या केरळ युनिटने उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती मागवली होती. त्यासाठी त्यांनी २०१९ च्या एका जुन्या आदेशाची झेरॉक्स प्रत आयोगाकडे जमा केली. त्या फोटोकॉपीवर भाजपचा शिक्का आधीच होता. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नजरचुकीमुळे, भाजपचा शिक्का असलेली तीच प्रत तशीच इतर सर्व राजकीय पक्षांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली.

असिस्टंट सेक्शन ऑफिसर निलंबित

निवडणूक आयोगाने हे प्रकरण गांभीर्याने घेत या फाइलची हाताळणी करणाऱ्या असिस्टंट सेक्शन ऑफिसरला निलंबित केले आहे. २१ मार्च रोजीच हे पत्र अधिकृतपणे मागे घेण्यात आले असून नवीन पत्र जारी करण्यात आले असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. "कुणीही दिशाभूल करणारे संदेश पसरवू नयेत, निवडणूक प्रक्रिया बाह्य प्रभावापासून मुक्त आहे," असे आवाहनही आयोगाने केले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर 'लेटर वॉर'

केरळमध्ये १४० जागांसाठी ९ एप्रिलला मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल लागणार आहे. मतदानाला काही दिवस उरले असतानाच हा घोळ समोर आल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Stamp on Election Commission Letter Sparks Controversy in Kerala

Web Summary : A letter with a BJP Kerala stamp, sent by the Election Commission, triggered controversy. Opposition parties accused the EC of bias. An officer was suspended, and the EC clarified it was a clerical error, urging no misinformation.
टॅग्स :Kerala Assembly Election 2026केरळ विधानसभा निवडणूक २०२६Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा