West Bengal: ममता दीदींविरोधात निवडणूक लढवण्यासाठी BJP कडून ‘ही’ ६ नावे चर्चेत; काँग्रेसमध्ये दोन गट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 03:58 PM2021-09-06T15:58:46+5:302021-09-06T16:01:36+5:30

West Bengal: भाजपकडून सहा उमेदवारांच्या नावांची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे.

bjp discuss 6 name as candidate against mamata banerjee in west bengal bypolls | West Bengal: ममता दीदींविरोधात निवडणूक लढवण्यासाठी BJP कडून ‘ही’ ६ नावे चर्चेत; काँग्रेसमध्ये दोन गट

West Bengal: ममता दीदींविरोधात निवडणूक लढवण्यासाठी BJP कडून ‘ही’ ६ नावे चर्चेत; काँग्रेसमध्ये दोन गट

Next
ठळक मुद्देभाजपकडून सहा उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरूकाँग्रेसमध्ये मतभेद, दोन गट पडल्याची चर्चा

कोलकाता:पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल. ममता बॅनर्जी यांनी सत्ता राखली. मात्र, नंदीग्राम येथून ममता बॅनर्जी पराभूत झाल्या. ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी निवडून येणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी भवानीपूर येथील विद्यमान आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगाने येथील पोटनिवडूक जाहीर केली आहे. ममता बॅनर्जी यांच्याविरोधात कोणीही उमेदवार उभा करू नये, असा इशारा तृणमूल काँग्रेसकडून देण्यात आला असला, तरी भाजपकडून सहा नावे चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, काँग्रेसमध्ये यावरून मतभेद असून, दोन गट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (bjp discuss 6 name as candidate against mamata banerjee in west bengal bypolls)

“काँग्रेससह सप-बसपला मतदान करणे म्हणजे पाप, त्यांना मंदिरा जायलाही भीती वाटते”: भाजप

ममता बॅनर्जी अपेक्षेप्रमाणे भवानीपूरमधूनच पोटनिवडणूक लढवतील, याची पुष्टी मदन मित्रा यांनी केली आहे. तसेच भाजपने भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार  उभा करून पैसे बरबाद करू नका. ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी आहे, असे टीएमसी नेते मदन मित्रा यांनी म्हटले आहे. असे असले तरी भाजपकडून सहा उमेदवारांच्या नावांची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसकडून मात्र याबाबत अद्याप कोणतीच स्पष्ट भूमिका घेण्यात आली नसून, यासंदर्भात दोन गट पडल्याची चर्चा असल्याचे बोलले जात आहे. 

“मोदी आणि योगी यांना मत देऊन मोठी चूक केली”; टिकैत यांनी व्यक्त केला संताप

भाजपकडून कोणती सहा नावे चर्चेत?

काही रिपोर्ट्सनुसार, ममता बॅनर्जी यांना भवानीपूर मतदारसंघात पोटनिवडणुकीत तगडी टक्कर देण्यासाठी भाजपकडून सहा उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू आहे. यामध्ये टीएमसीचे माजी खासदार दिनेश त्रिवेदी यांचे नाव सर्वांत आघाडीवर आहे. यानंतर रुद्रनील घोष, मेघालय आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल तथागत रॉय, अनिर्बान गांगुली, स्वपन दासगुप्ता आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप बॅनर्जी यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. काही भाजप नेत्यांच्या मते दिनेश त्रिवेदी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात लढण्यासाठी योग्य उमेदवार आहेत. 

“मोदी सरकार देशाच्या संपत्तीवर दिवसाढवळ्या दरोडा घालतंय”; काँग्रेसचा घणाघात

दरम्यान, ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री पदावर टिकून राहण्यासाठी ही पोटनिवडणूक जिंकणे आवश्यक आहे. नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत होऊन मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांना ५ नोव्हेंबरपर्यंत आमदार होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामच्या निवडणूक निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, यावर पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होईल.
 

Web Title: bjp discuss 6 name as candidate against mamata banerjee in west bengal bypolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.