शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:37 IST

Bihar Election Latest News: बिहारचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासाठी राघोपूरची लढत चुरशीची ठरली आहे.

बिहारमध्ये एनडीएने हरियाणा, महाराष्ट्र, दिल्लीसारखीच मोठी कामगिरी करून दाखविली आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वात एनडीएला १८६ जागांवर आघाडी मिळाली असून तेजस्वी यादव यांचे महागठबंधन ४९ जागांवर येऊन ठेपले आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे तेजस्वी यादव यांच्यासाठी राघोपूरची लढत चुरशीची ठरू लागली आहे. तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघात पाचव्या फेरीत केवळ १०५ मतांनी पिछाडीवर गेले आहेत. 

बिहारचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासाठी राघोपूरची लढत चुरशीची ठरली आहे. पाचव्या फेरीअखेर त्यांना भाजपचे उमेदवार सतीश कुमार यांच्याकडून केवळ १०५ मतांनी पिछाडीवर राहावे लागले आहे. ही अत्यंत कमी मतांची तफावत पाहता, राघोपूरमध्ये निकालासाठी मतदारांना आणि राजकीय निरीक्षकांना शेवटपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाआघाडीसाठी हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे.

विजय सिन्हांचा 'जलवा' कायम; लखीसरायमध्ये मोठा फरकभाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी लखीसराय मतदारसंघात आपली पकड मजबूत ठेवली आहे. पाचव्या फेरीनंतर त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर ५३९६ मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यांची ही आघाडी पाहता, लखीसरायचा गड त्यांच्यासाठी सुरक्षित असल्याचे दिसत आहे.

भाकपा मालेची घोसीमध्ये दमदार एंट्री!जहानाबाद जिल्ह्यातील घोसी विधानसभा मतदारसंघातील चित्र लक्षणीय आहे. येथे भाकपा मालेच्या उमेदवाराने पाचव्या फेरीत तब्बल ६२०५ मतांची मोठी आघाडी घेऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा विजय भाकपा मालेच्या वाढत्या ताकदीचे संकेत देत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election Results: Tejashwi Yadav trails in Raghopur; Sinha leads.

Web Summary : In Bihar, NDA leads. Tejashwi Yadav trails in Raghopur. Vijay Sinha maintains lead in Lakhisarai. CPI (ML) gains in Ghosi. The battle in Raghopur is tight.
टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BiharबिहारNitish Kumarनितीश कुमार