शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:00 IST

Bihar Assembly Election Result 2025 News & Results Live Updates: बिहारच्या निकालाचे गणित पाहून जेडीयूचे कार्यकर्तेही चक्रावून जातील...

Bihar Assembly Election Result 2025 News & Results Live Updates: बिहार निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि चिराग पासवान यांच्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. १०१ लढवलेल्या जागांपैकी भाजपने ९५ जागांवर आघाडीवर आहे. २८ जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या चिराग पासवान यांचा एलजेपी (आर) २१ जागांवर आघाडीवर आहे. तर उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा (Rashtriya Lok Morcha) चार आणि जीतन राम मांझी यांचा हिंदुस्थानी आवाम मोर्चा (HAMS) पाच जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. एकूणच, नितीश कुमार यांच्याशिवाय बिहारमध्ये या चारही पक्षांनी मिळून १२२ जागांचा आकडा ओलांडला आहे. या चौघांना मिळून अंदाजे १२५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना यावेळी मुख्यमंत्रिपद हुलकावणी देणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

नितीश कुमार अधिकृत उमेदवार नाहीत!

बिहारमध्ये, एनडीएने नितीश कुमार यांना अधिकृतपणे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलेले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्या मते, मुख्यमंत्री लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडले जातील. बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. नियमानुसार, राज्यपाल प्रथम सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात. त्यामुळे भाजपा कदाचित मुख्यमंत्रीपदावर दावा सांगू शकतो, अशा चर्चा सुरू आहेत.

नितीश कुमारांच्या घरी हालचालींना वेग

बिहार निवडणुकीच्या निकालांच्या दरम्यान, नितीश कुमार यांच्या निवासस्थानी हालचाली तीव्र झाल्या आहेत. जेडीयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय कुमार झा आणि मंत्री अशोक चौधरी नितीश यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. संजय झा संपूर्ण प्रकरणात भाजपशी समन्वय साधत आहेत.

नितीश कुमारांना इतरांचीही साथ नाही

यंदाच्या निकालांमध्ये राजद आणि काँग्रेस मागे पडले आहेत. बिहार निवडणुकीत महाआघाडीतील सहा पक्षांना फक्त ३० जागांवर आघाडी असल्याचे दिसून येते. या पक्षांना सोबत घेऊन नितीश कुमार यावेळी मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. २०२०च्या निवडणुकीनंतर, नितीश यांनी २०२२ मध्ये राजदसह जात सत्तास्थापना केली होती. पण यावेळी तो पर्यायही उपलब्ध नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Will BJP oust Nitish Kumar in Bihar to install own CM?

Web Summary : Bihar election results suggest BJP's rise. Without Nitish, NDA crosses 122 seats. BJP may claim CM post, sidelining Kumar, as JDU support wanes.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BiharबिहारElectionनिवडणूक 2024Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीchirag paswanचिराग पासवानBJPभाजपाTejashwi Yadavतेजस्वी यादव