शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:02 IST

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ चा निकाल राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या कलांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या पुनरागमनाच्या आशेला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, एनडीए स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत असून, महाआघाडी ५० पेक्षा कमी जागेवर आघाडीवर आहे.  दरम्यान, तेजस्वी यादव यांच्या प्रचारात मोठी गर्दी दिसूनही निकालांमध्ये आघाडी मिळवता आली नाही. त्यांच्या रणनीतीत नेमक्या कोणत्या त्रुटी राहिल्या, याची चर्चा सुरू झाली आहे. 

२०२० मध्ये ७८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनलेल्या आरजेडीला यावेळी फक्त ३३ जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे, जे गेल्या वेळेच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी आहे. एनडीए २०० जागांचा आकडा ओलांडण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, जर हे कल निकालात रूपांतरित झाले, तर हा पराभव २०१० च्या निवडणुकीसारखा असेल, जेव्हा आरजेडीला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले होते. 

तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात

 

१) लालू यादव यांची प्रचारात अनुपस्थिती

बिहारच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेले लालू प्रसाद यादव यांची निवडणुकीच्या प्रचारात असलेली अनुपस्थिती आरजेडीला महागात पडली. लालूंच्या अनुपस्थितीमुळे अनेक समर्थक निराश झाले. दुसरीकडे, विरोधकांनी प्रचारात 'जंगल राज'चा सातत्याने उल्लेख केला. ज्यामुळे आरजेडीच्या नुकसान झाले.

२) कौटुंबिक कलह

तेजप्रताप यादव यांनी या निवडणुकीत वेगळ्या पक्षातून निवडणूक लढवली. त्यांनी केवळ स्वतःचा पराभव करून घेतला नाही, तर अनेक ठिकाणी आरजेडीच्या उमेदवारांना नुकसान पोहोचवले. तेज प्रताप यांच्या या भूमिकेमुळे आरजेडीला मोठा फटका बसला. कौटुंबिक कलहामुळे २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात सपाला जसा फटका बसला, तसाच फटका आरजेडीला बसल्याचे दिसून येते.

३) नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांची एकजूट

एनडीएने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट समन्वय राखला. जागावाटप स्पष्ट झाले आणि वेळेत प्रचार सुरू झाला. विशेष म्हणजे, नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा एकत्र मंचावर येऊन प्रचार केला, ज्यामुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला. याउलट, महाआघाडी कमकुवत दिसली.

४) आश्वासनांऐवजी कामगिरीवर विश्वास

तेजस्वी यादव यांनी प्रत्येक कुटुंबाला सरकारी नोकरी देण्यासह अनेक मोठी आश्वासने दिली. मात्र, नितीश कुमार यांची महिलांना १०,००० रुपये देण्याची योजना तेजस्वी यादव यांच्यावर भारी पडली. मतदारांनी आश्वासनांऐवजी जुन्या कामगिरीवर अधिक विश्वास ठेवल्याचे दिसून येते.

५) जागा वाटपाचा वाद आणि काँग्रेसचा कमकुवत प्रचार

महाआघाडीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचा वाद पूर्णपणे सुटला नाही. सुमारे एक डझन जागांवर मैत्रीपूर्ण लढती झाल्याची चर्चा आहे. शिवाय, प्रचाराचे नेतृत्व करणारे राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. काँग्रेसने ६२ जागा लढवूनही फक्त ५ जागांवर आघाडी मिळवली आहे, ज्यामुळे महाआघाडीच्या एकूण कामगिरीवर नकारात्मक परिणाम झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : NDA leads in Bihar; 5 mistakes that cost Tejashwi Yadav

Web Summary : NDA's Bihar victory hinges on Lalu's absence, family feud, and strong coordination. Nitish-Modi unity and focus on performance overshadowed Tejashwi's promises and Congress's weak showing.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Tejashwi Yadavतेजस्वी यादवPoliticsराजकारण