शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

बाबा रामपालला अटक

By admin | Updated: November 20, 2014 11:26 IST

स्वयंघोषित बाबा रामपाल याला बुधवारी रात्री त्याच्या सतलोक आश्रमातून पोलिसांनी अटक केली.

तणावपूर्ण कोंडी फुटली : आज कोर्टात हजर करणारबरवाला (हरियाणा) : स्वयंघोषित बाबा रामपाल याला बुधवारी रात्री त्याच्या सतलोक आश्रमातून पोलिसांनी अटक केली. रामपालच्या अटकेसोबतच मागील दोन आठवड्यांपासून रामपाल समर्थक आणि पोलीस यांच्यादरम्यान सुरू असलेली तणावपूर्ण कोंडीही फुटली आहे. रामपालला अटक होऊ नये यासाठी त्याच्या १५००० भक्तांनी आश्रमात ठाण मांडून पोलिसांना कारवाई करण्यास रोखले होते. या सर्व भक्तांना आश्रमाबाहेर काढण्यात आल्यानंतर पोलिसांनी आश्रमात प्रवेश केला आणि रामपालला जेरबंद केले.या ६३ वर्षीय वादग्रस्त बाबाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यानंतर गुरुवारी त्याला हिसारच्या न्यायालयातपुढे हजर करण्यात येईल, असे पानिपतचे पोलीस अधीक्षक सतीश बालान यांनी पत्रकारांना सांगितले. पोलिसांना रामपालच्या खासगी कमांडोंसोबतही दोन हात करावे लागले. त्यामुळे त्याला अटक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असे डीजीपी एस. एन. वशिष्ठ यांनी सांगितले.याआधी मंगळवारी रामपालच्या याच आश्रमात चार महिलांना रहस्यमय मृत्यू झाला होता आणि दोन महिला रूग्णालयात उपचारादरम्यान दगावल्या होत्या.रामपालला २१ नोव्हेंबरपर्यंत अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते आणि त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी केला होता. रामपालला अटक करण्यासाठी त्यांच्या सतलोक आश्रमात गेलेल्या पोलिसांचा मंगळवारी रामपालांच्या समर्थकांसोबत भीषण संघर्ष उडाला होता. या धुमश्चक्रीत पोलीस, माध्यमांच्या प्रतिनिधींसह शंभरावर लोक जखमी झाले होते. बुधवारी संपूर्ण दिवसभर रामपालच्या अटकेवरून अतिशय नाट्यमय घडामोडी घडत राहिल्या आणि पोलिसांनी वारंवार आवाहन केल्यानंतरही तो आत्मसमर्पण न करण्यावर अडून राहिला. रामपालने आत्मसमर्पण केले नसून त्याला अटक करण्यात आली आहे, असे बालान यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)--------------रामपालच्या अटकेनंतर आश्रमात अडकलेल्यामहिला आणि मुलांसह अनेक समर्थक एकेक करून बाहेर पडले. आपल्याला बळजबरीने आश्रमात ठेवले आणि दार बाहेरून बंद केले होते, असे अनेकांनी सांगितले. हरियाणा पोलिसांनी रामपालविरुद्ध अनेक नवे गुन्हे दाखल केले आहेत. रामपालला शुक्रवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.