शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

अफवा रोखण्यासाठी महाराष्ट्रासह १0 राज्यांत व्हॉट्सअ‍ॅपची जागृती; प्रादेशिक भाषांतून देणार माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 3:31 AM

खोट्या बातम्या व अफवांचा प्रसार रोखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने रेडिओच्या माध्यमातूनही जनजागृती मोहीम हाती घेतली आली आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशसहित एकूण दहा राज्यांमध्ये या मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्यास बुधवारपासून सुरुवात झाली.

नवी दिल्ली : खोट्या बातम्या व अफवांचा प्रसार रोखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने रेडिओच्या माध्यमातूनही जनजागृती मोहीम हाती घेतली आली आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशसहित एकूण दहा राज्यांमध्ये या मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्यास बुधवारपासून सुरुवात झाली.फेसबुकच्या मालकीची कंपनी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपवरून अफवा, खोटी माहिती पसरविली गेल्याने काही भागांमध्ये जबर मारहाण करून निरपराध लोकांना ठार मारण्याच्या घटना घडल्या होत्या. अफवांचा प्रसार रोखण्यासाठी परिणामकारक पावले न उचलल्याबद्दल व्हॉट्सअ‍ॅपचे केंद्र सरकारने कान उपटले होते.त्यानंतर खडबडून जागे झालेल्या या समाजमाध्यमाने रेडिओच्या माध्यमातून बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये २९ आॅगस्टपासून जनजागृती मोहीम हाती घेतली.१५ दिवसांचा टप्पाव्हॉट्सअ‍ॅपचा बुधवारपासून सुरू झालेला जनजागृतीचा दुसरा टप्पा १५ दिवसांचा असेल. त्यात महाराष्ट्र, आसाम, त्रिपुरा, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, ओरिसा, तामिळनाडू आदी दहा राज्यांत ८३ रेडिओ केंद्रावरून व्हॉट्सअ‍ॅपतर्फे जनजागृती करण्यात येईल. या मोहिमेत मराठी, तेलुगू, कन्नड, उडिया, तामिळ, गुजराती, बंगाली, आसामी या प्रादेशिक भाषांतून माहिती दिली जाईल.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपIndiaभारत