शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

जाती-धर्माच्या आधारावर निवडणुकीत प्रचार टाळा; आयोगाने दिला भाजप, काँग्रेसला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 06:59 IST

निवडणुकीमुळे देशाची सामाजिक-सांस्कृतिक  वीण उसवता कामा  नये, असेही आयोगाने म्हटले आहे...

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने बुधवारी जात, समुदाय, भाषा आणि धार्मिक निकषांवर प्रचार करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला भाजप आणि काँग्रेसला दिला. निवडणुकीमुळे देशाची सामाजिक-सांस्कृतिक  वीण उसवता कामा  नये, असेही आयोगाने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केलेल्या भाषणावरून भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना नोटीस बजावल्यानंतर  महिनाभरानंतर निवडणूक निरीक्षकांनी त्यांचा बचाव नाकारला. भाजपच्या पक्षाच्या स्टार प्रचारकांना धार्मिक आणि सांप्रदायिक प्रचारापासून दूर राहण्यास सांगितले. समाजात फूट पाडणारी प्रचाराची भाषणे थांबवावीत, असेही आयोगाने भाजपला सांगितले. नड्डा यांच्यासह निवडणूक आयोगाने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही अशीच नोटीस बजावून त्यांना विरोधी पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने केलेल्या तक्रारींना उत्तर देण्यास सांगितले होते.

निवडणूक आयोगाने खरगे यांचाही बचाव नाकारला. संरक्षण दलांचे राजकारण करू नये, तसेच सशस्त्र दलांच्या सामाजिक - आर्थिक रचनेबाबत संभाव्य फूट पाडणारी विधाने करू नयेत, असे सांगितले. त्यांचे स्टार प्रचारक आणि उमेदवार राज्यघटना रद्द किंवा बदलली जाऊ शकते, असा चुकीचा आभास देणारी विधाने करणार नाहीत, याची काळजी घेण्याचे निर्देशही आयोगाने खरगे यांना दिले. 

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करा- देशातील निवडणुकीची परंपरा आणि लोकशाहीच्या मूल्यांना कोणत्याही परिस्थितीत धक्का लागता कामा नये. राजकीय पक्षांवर वर्तमानातच नव्हे, तर भविष्यातील नेते घडविण्याची जबाबदारी आहे.- पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना प्रचारावेळी शिस्त व नियमावलींबाबत मार्गदर्शन करावे, असा सल्ला आयोगाने दिला आहे. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण