Assembly Election Results Live : नंदीग्राम मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करण्याची तृणमूलची मागणी

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 07:33 AM2021-05-02T07:33:53+5:302021-05-02T21:11:50+5:30

Assembly Election Results 2021 Live: पश्चिम बंगाल West Bengal, तामिळनाडू Tamil Nadu, आसाम Assam, केरळ Kerala, पुदुचेरी Puducherry विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे लाईव्ह अपडेट्स. ममता बॅनर्जी विरुद्ध नरेंद्र मोदी लढतीकडे देशाचं लक्ष. एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार का, केरळमध्ये पिनराई विजयन इतिहास घडवणार का, तामिळनाडूत पुन्हा द्रमुकची लाट येणार का, आसाममध्ये भाजपा सत्ता राखणार का, याबद्दल उत्सुकता.

Assembly Elections 2021 Live Results: West Bengal, Tamil Nadu, Assam, Kerala, Puducherry Assembly Election | Assembly Election Results Live : नंदीग्राम मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करण्याची तृणमूलची मागणी

Assembly Election Results Live : नंदीग्राम मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करण्याची तृणमूलची मागणी

Next

कोरोना महामारीच्या सावटामध्ये ४ राज्ये आण‍ि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभांसाठी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी रविवार, २ मे रोजी होणार असून, मतदारांनी कोणाला कौल दिला, हे उघड होणार आहे. मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार असून, त्या दरम्यान कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. दुपारपर्यंत विधानसभांचे चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आण‍ि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. आसाममध्ये तीन तर पश्च‍िम बंगालमध्ये सर्वाधिक ८ टप्प्यांमध्ये मतदान झाले होते. Assembly Elections 2021 Result Live Updates : West Bengal, Tamil Nadu, Assam, Kerala, PuducherryAssembly Election

LIVE

Get Latest Updates

09:16 PM

निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार; भाजपा कार्यालयाला भीषण आग


 

09:11 PM

नंदीग्राम मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करण्याची तृणमूलची मागणी

09:08 PM

नंदिग्राम मतदारसंघाच्या मतमोजणीवरून तृणमूलचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटलं. पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी

09:07 PM

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केलं ममता बॅनर्जींचं अभिनंदन

08:41 PM

"तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यालयात लावली आग"

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी याबाबत तृणमूल काँग्रेसवर आरोप केला आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यालयात आग लावली असून भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा दावा  करण्यात आला आहे.

08:29 PM

बंगाल निकालानंतर ममतांचा इशारा; संपूर्ण देशाला मोफत कोरोना लस मिळाली नाही, तर आंदोलन करणार

08:28 PM

पश्चिम बंगालच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ममता बॅनर्जींचे अभिनंदन, केंद्राकडून राज्याला नेहमी पाठिंबा राहील अशी दिली ग्वाही

08:12 PM

शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली

07:58 PM

पश्चिम बंगालच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ममता बॅनर्जींचे अभिनंदन, केंद्राकडून राज्याला नेहमी पाठिंबा राहील अशी दिली ग्वाही

07:48 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन

07:33 PM

बंगालमध्ये जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल - शरद पवार

07:03 PM

केरळच्या जनतेने सत्ता दिली, पण विजय साजरा करायची ही वेळ नाही - पिनराई विजयन

06:53 PM

आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपा आघाडीचं सरकार

06:50 PM

केरळचा गड राखत डाव्यांनी इतिहास रचला! ४० वर्षांची परंपरा खंडित; काँग्रेसचा पराभव

06:49 PM

"फूट पाडणाऱ्या आणि विभाजन करणाऱ्यांना जनतेने नाकारलं", मेहबुबा मुफ्तींकडून ममतांचं अभिनंदन

06:36 PM

केरळचा गड राखत डाव्यांनी इतिहास रचला! ४० वर्षांची परंपरा खंडित; काँग्रेसचा पराभव

06:25 PM

प.बंगालमधील विजयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ममता दीदींचे अभिनंदन केलं आहे.

06:01 PM

"सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी मिळवला विजय"

पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज प. बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो - मुख्यमंत्री 

05:46 PM

"विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल"

ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल - मुख्यमंत्री 

05:43 PM

ममता जिंकल्या! आता कोरोनाकडे लक्ष देऊया - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता जिंकल्या, आता कोरोनाकडं लक्ष देऊया असं म्हटलं आहे.

05:37 PM

ममता बॅनर्जींनी मानले जनतेचे आभार

05:35 PM

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन

05:12 PM

देशाचे लक्ष लागून राहिलेल्या नंदीग्राम येथील अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांनी मारली बाजी

04:56 PM

लडबो रे... जितबो रे... ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला; पश्चिम बंगालचा गडही राखला

04:32 PM

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 1200 मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचा पराभव केला आहे.

04:27 PM

"मोदी आणि अमित शहा अजेय नाहीत"

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा अजेय नाहीत; त्यांचा पराभव शक्य आहे, हा स्पष्ट संदेश ममता बॅनर्जींनी दिलाय - शिवसेना खासदार संजय राऊत

04:24 PM

केजरीवालांकडून ममतांना खास अंदाजात शुभेच्छा

04:16 PM

आसाममध्ये भाजपा आघाडीवर

04:06 PM

ममता बॅनर्जी अवघ्या 6 मतांनी पिछाडीवर

03:54 PM

आता थांबायचंय, आयुष्यात दुसरं काहीतरी करेन; प्रशांत किशोर यांची 'राजनीती' सोडण्याची घोषणा

03:44 PM

ममतांच्या विजयानं राहुल गांधींचं टेंशन वाढणार

03:25 PM

ममता बॅनर्जींची आघाडी

सुवेंदु अधिकारी पुन्हा एकदा पिछाडीवर, ममता बॅनर्जींनी घेतली 8000 मतांची आघाडी

03:23 PM

"ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून हरतीलही, नाकारता येत नाही"

ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून हरतीलही, नाकारता येत नाही. जरी त्या हरल्या तरीदेखील त्यांचा पक्ष असल्याने मुख्यमंत्री म्हणून त्यांनाच निवडले जाईल. त्यांच्या भाच्याला तसेही तृणमूलचे नेते पक्षाचा अध्यक्षदेखील बनवू इच्छित नाहीएत - ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला

03:13 PM

ममता बॅनर्जी हरल्या तर काय होईल?; पहा काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला

ममता या जर हरण्याच्या स्थितीत असतील तर त्यांचा पक्ष कधीही बहुमतात येणार नाही. जेव्हा ममता जिंकणार असतील तेव्हाच तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळेल - ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला

03:08 PM

पश्चिम बंगालमधील निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दीदींचं अभिनंदन करताना महत्वपूर्ण संकेत दिले आहेत.

02:54 PM

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा झाला पराभव, चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं नेमकं कारण

बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांनी तृणमूल काँग्रेससोबच अघोषित आघाडी केल्याचे दिसून आहे. काँग्रेस आणि डाव्यांनी आपली मते तृणमूलच्या पारड्यात टाकली, त्यामुळे भाजपाच्या जागा कमी झाल्या असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. 

02:52 PM

भाजपाला रोखण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले

पश्चिम बंगालमध्ये भाजपाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. येथे भाजपाला रोखण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते. बंगालमध्ये एकेकाळी निर्विवाद सत्ता राखणारे डावे आणि जास्त जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे संख्याबळ मर्यादित राहिलेले दिसते - चंद्रकांत पाटील 

02:51 PM

शरद पवारांचा 'तो' अंदाज शतप्रतिशत खरा ठरला; दीड महिन्यापूर्वीच वर्तवलं होतं निकालाचं भाकित

02:49 PM

पश्चिम बंगालमध्ये भाजपा द्वेषाचं राजकारण पराभूत करणारी जागरूक जनता, आक्रमकपणे लढा देण्याऱ्या ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या नेत्यांना शुभेच्छा - 

02:43 PM

अखिलेश यादवांचा मोदींना सणसणीत टोला

02:27 PM

बंगालमध्ये भाजपचे दिग्गज नेते पिछाडीवर पडले; मतदारांचा 'खेला' पाहून बडे नेतेही चक्रावले

02:27 PM

ममता पुन्हा 3800 मतांनी पिछाडीवर

ममता बॅनर्जींची आघाडी औटघटकेची ठरली आहे. पुन्हा 3800 मतांनी पिछाडीवर गेल्या आहेत. १३ व्या राऊंडनंतर ममतांना  सुवेंदू अधिकारी यांनी मागे टाकले आहे.

02:13 PM

कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे निवडणूक आयोगाने पाच राज्ये आणि लोकसभा विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये निकालानंतर कोणताही जल्लोष न करण्याचे आदेश दिले होते.

02:13 PM

पहिल्यांदाच नंदीग्राममध्ये आघाडी घेतली

01:56 PM

तामिळनाडूत 'द्रविडी' दणका; अम्मांच्या पक्षाला 'बुरे दिन'

01:55 PM

बंगालमध्ये दिदींचाच खेला! सर्व एक्झिट पोलचा अंदाज चुकला; भाजपला दे धक्का

01:54 PM

अखिलेश यादव यांचा मोदींना टोला

पश्चिम बंगालच्या जनतेनं 'दिदी ओ दिदी'चं जबरदस्त उत्तर दिलंय; समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा पंतप्रधान मोदींना टोला

01:52 PM

Kerala Election Result : केरळमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची कमाल

01:35 PM

बंगालमध्ये भाजपचे दिग्गज नेते पिछाडीवर पडले; मतदारांचा 'खेला' पाहून बडे नेतेही चक्रावले

01:11 PM

नंदीग्राममध्ये पहिल्यांदाच ममता बॅनर्जी या शुभेंदू अधिकारी यांच्या पुढे

01:06 PM

भाजपाने तृणमूलला नाही डाव्यांना संपवले; तृणमूल 200 तर डावे 77 वरून थेट शून्यावर

12:50 PM

केरळ - भाजपाचे सुरेश गोपी थ्रिसुर मतदार संघातून आघाडीवर.

12:42 PM

तामिळनाडू - डीएमकेचे उदयनिधी स्टॅलिन चेपूक थिरुवेल्लीकेनी मतदारसंघातून आघाडीवर

12:39 PM

Assembly Election Result 2021 : कपिल सिब्बल यांचं मोठं विधान

12:21 PM

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 200 पार, भाजपा 88

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 200 पार, भाजपा 88 वर

12:06 PM

सध्याचे पाचही राज्यांचे कल...

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 196, भाजपा 94, डावे 0, अन्य़ 2 जागांवर आघाडीवर.
तामिळनाडू डीएमके 140, एडीएमके 90, एमएनएफ 1, अन्य 3
पुदुचेरी एनडीए 10, युपीए 3, अन्य 1
केरळ एलडीएफ 89, युडीएफ 47, भाजपा 03, अन्य १
आसाम- काँग्रेस 41, भाजपा 84, अन्य 1.

12:03 PM

सायंकाळी सहा वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार. मतमोजणीवर घोषणा करण्याची शक्यता.

सायंकाळी सहा वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार. मतमोजणीवर घोषणा करण्याची शक्यता.  

11:59 AM

केरळ - भाजपाचे सुरेश गोपी थ्रिसुर मतदार संघातून आघाडीवर.

केरळ - भाजपाचे सुरेश गोपी थ्रिसुर मतदार संघातून आघाडीवर. 



 

11:56 AM

तामिळनाडू - डीएमकेचे उदयनिधी स्टॅलिन चेपूक थिरुवेल्लीकेनी मतदारसंघातून आघाडीवर.

तामिळनाडू - डीएमकेचे उदयनिधी स्टॅलिन चेपूक थिरुवेल्लीकेनी मतदारसंघातून आघाडीवर. 



 

11:49 AM

सहाव्या फेरीनंतर देखील ममता बॅनर्जी 7262 मतांनी पिछाडीवर.

सहाव्या फेरीनंतर देखील ममता बॅनर्जी 7262 मतांनी पिछाडीवर. सुवेंदू अधिकारींची नंदीग्राममध्ये आघाडी. 



 

11:47 AM

तामिळनाडूत डीएमकेचा जल्लोष सुरु; पण पश्चिम बंगालमध्ये तृणमूलमध्ये सन्नाटा

तामिळनाडूमध्ये डीएमकेला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे पाहून कार्यकर्ते अन्ना अरिवल्यमबाहेर जल्लोष करत आहेत. परंतू तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता यांनी कार्यकर्त्यांना तृणमूल जिंकत असल्याचा संदेश दिला आहे. मात्र, ममतांची जागा धोक्यात असल्याने तिथे सन्नाटा पसरला आहे. 



 

11:32 AM

निवडणूक कलानुसार आसाममध्ये भाजपा सरकार स्थापन करणार: मुख्यमंत्री सर्बनानंद सोनवाल



 

11:26 AM

सध्याचे पाचही राज्यांचे कल...

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 188, भाजपा 100, डावे 0, अन्य़ 3 जागांवर आघाडीवर.
तामिळनाडू डीएमके 140, एडीएमके 91, एमएनएफ 1, अन्य 2
पुदुचेरी एनडीए 10, युपीए 3
केरळ एलडीएफ 87 युडीएफ 4८, भाजपा 04, अन्य १
आसाम- काँग्रेस 38, भाजपा 85, अन्य 1.

11:24 AM

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगानुसार तृणमूल काँग्रेस 166 जागांवर तर भाजपा 83 जागांवर आघाडीवर. 253 जागांचा कल.


11:20 AM

केरळचे मुख्यमंत्री धर्मदाम मतदारसंघातून आघाडीवर



 

11:06 AM

तामिळनाडूमध्ये मक्कल निधी मैयमचे प्रमुख आणि अभिनेते कमल हासन कोईंबतूर दक्षिणमध्ये आघाडीवर.

तामिळनाडूमध्ये मक्कल निधी मैयमचे प्रमुख आणि अभिनेते कमल हासन कोईंबतूर दक्षिणमध्ये आघाडीवर.



 

10:41 AM

निवडणूक आयोगानुसार आसाममध्ये भाजपा 31, आसाम गण परिषद 6, काँग्रेस 9 आणि एआययुडीएफ 5 जागांवर आघाडीवर



 

10:39 AM

निवडणूक आयोगानुसार टीएमसी 112 जागांवर पुढे, तर भाजपा 58.



 

10:36 AM

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला 'बहुमत'; पण 'वाघीण' 8106 मतांनी मागे

पश्चिम बंगालमध्ये भाजपा 117 जागांवर आघाडीवर असून तृणमूलने भाजपाला मागे टाकले आहे. तृणमूल सध्याच्या कलानुसार 162 जागांवर पुढे आहे. तर ममता बॅनर्जी या 8106 मागे आहेत.

10:33 AM

केरळ : भाजपाचे मेट्रो मॅन ई श्रीधरन पलक्कड मतदारसंघातून आघाडीवर.



 

10:31 AM

पश्चिम बंगाल: टोलीगंज येथून भाजपाचे बाबुल सुप्रियो पिछाडीवर, तृणमूलचे अरूप बिश्वास आघाडीवर



 

10:19 AM

तृणमूलने खेळ केला, भाजपाला टाकले मागे

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 150, भाजपा 117, डावे 3, अन्य़ 3 जागांवर आघाडीवर.
तामिळनाडू डीएमके 102, एडीएमके 52, एमएनएफ 1
पुदुचेरी एनडीए 10, युपीए 4
केरळ एलडीएफ 94 युडीएफ 45 , भाजपा 0
आसाम- काँग्रेस 38, भाजपा 73, अन्य 2.
 

10:16 AM

खेला होबे की खेळ संपणार? देशभरातील ५ राज्यांच्या ८२२ जागांना फक्त नंदीग्रामची एक सीट भारी

West Bengal Election Result 2021 Highlights: खेला होबे की खेळ संपणार? देशभरातील ५ राज्यांच्या ८२२ जागांना फक्त नंदीग्रामची एक सीट भारी

10:16 AM

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बंगालमध्ये तृणमूल 68, भाजपा 36 जागांवर आघाडीवर. 




 

09:41 AM

पाच राज्यांच्या सुरुवातीचे कल खालीलप्रमाणे...

सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 116, भाजपा 109, डावे 2, अन्य़ २ जागांवर आघाडीवर.
तामिळनाडू डीएमके 46, एडीएमके 23, एमएनएफ 1
पुदुचेरी एनडीए 8, युपीए 3
केरळ एलडीएफ 62 युडीएफ 23 , भाजपा 1
आसाम- काँग्रेस 34, भाजपा 51, अन्य 1.

09:31 AM

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार तृणमूल ७ तर भाजपा ३ जागांवर आघाडीवर.


09:04 AM

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर

09:00 AM

"पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा विजय झाल्यास तो मोदी-शाह यांचा व्यक्तिगत पराभव मानायला हवा"

औषधे, ऑक्सिजनअभावी रोज पाच हजारांवर चिता पेटत असताना राजकीय खेळ कोणाला सुचतात कसे?, संजय राऊत यांचा सवाल

West Bengal Results 2021: "पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा विजय झाल्यास तो मोदी-शाह यांचा व्यक्तिगत पराभव मानायला हवा"

08:36 AM

तामिळनाडू, आसाम आणि केरळमध्ये सुरुवातीचे कल आले समोर

तामिळनाडूमध्ये डीएमके 10 तर एडीएएमके 1 जागेवार पुढे. 
आसाममध्ये भाजपा 5, काँग्रेस 3 जागांवर पुढे. 
केरळमध्ये एलडीएफ 31 काँग्रेस 27 भाजपा 3
 

08:26 AM

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल ३१ तर भाजपा २४ जागांवर पुढे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल ३१ तर भाजपा २४ जागांवर पुढे. 

 

08:23 AM

पाचही राज्यांमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात.



 

08:16 AM

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष पुढे, तृणमूल १२ तर भाजपा ७ जागांवर पुढे



 

07:59 AM

केरळच्या मल्लपुरममध्ये ईव्हीएम असलेली स्ट्राँग रुम उघडली.



 

07:47 AM

केरळ: काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी पुथुप्पल्ली चर्चमध्ये प्रार्थना केली. पुथुप्पल्ली विधानसभा मतदारसंघातून ओमन चंडी निवडणूक लढवत आहेत.

पुथुप्पल्ली विधानसभा मतदारसंघातून ओमन चंडी निवडणूक लढवत आहेत.



 

07:39 AM

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ, पुदुचेरी विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होणार.



 



 

Web Title: Assembly Elections 2021 Live Results: West Bengal, Tamil Nadu, Assam, Kerala, Puducherry Assembly Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.