West Bengal Election Result 2021 Highlights: खेला होबे की खेळ संपणार? देशभरातील ५ राज्यांच्या ८२२ जागांना फक्त नंदीग्रामची एक सीट भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 10:11 AM2021-05-02T10:11:20+5:302021-05-02T10:13:49+5:30

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: ममता या अधिकारी यांना काहीही करून पाडणार याच निश्चयाने तिथे लढत आहेत. नंदीग्रामची जागा 2009 पासून तृणमूलच्या ताब्यात आहे. 2016 मध्ये तिथे तृणमूलला एकूण 87 टक्के मतदान झाले होते.

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: Nandigram is heavy for 822 seats in 5 states, Mamata banerjee, suvendu adhikari | West Bengal Election Result 2021 Highlights: खेला होबे की खेळ संपणार? देशभरातील ५ राज्यांच्या ८२२ जागांना फक्त नंदीग्रामची एक सीट भारी

West Bengal Election Result 2021 Highlights: खेला होबे की खेळ संपणार? देशभरातील ५ राज्यांच्या ८२२ जागांना फक्त नंदीग्रामची एक सीट भारी

Next

देशभरात आजचा दिवस कोरोना काळातील हायव्होल्टेज निवडणुकांच्या निकालाचा आहे. निवडणूक आयोगाने कोणीही जल्लोष करू नये असे आदेश दिले आहेत. तरीही ही निवडणूक भाजपासाठी मोठा जल्लोष करण्यासारखी असणार आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये 3 वरून तीन आकडी जागा मिळविताना ममता बॅनर्जी (Mamata banrejee) यांचा पराभव आणि त्यांच्या सत्तेचे पतन अशा दोन गोष्टी भाजपाला साधण्याची संधी चालून आली आहे. (Mamata banerjee is trailing from Nandigram.)


पहिल्या पोस्टल मत मोजणीमध्ये एकेकाळचे ममता यांचे सहकारी सुवेंदू अधिकारी हे पुढे असून ममता या 1500 मतांनी पिछाडीवर आहेत. महत्वाचे म्हणजे देशभरात जवळपास 822 मतदारसंघांमध्ये निवडणूक झाली आहे, यापैकी नंदीग्राम ही अशी एकच सीट आहे जी या साऱ्यांवर भारी पडली आहे. कारण ममता या अधिकारी यांना काहीही करून पाडणार याच निश्चयाने तिथे लढत आहेत. नंदीग्रामची जागा 2009 पासून तृणमूलच्या ताब्यात आहे. 2016 मध्ये तिथे तृणमूलला एकूण 87 टक्के मतदान झाले होते. सुवेंदू अधिकारी यांनी सीपीएमच्या अब्दुल कबीर यांचा 81,230 मतांनी पराभव केला होता. हाच मतदारसंघ बंगालचे पुढील राजकारण आणि सत्तासंघर्षाची दिशा निश्चित करणार आहे. नंदीग्राममधून आठ जण निवडणूक लढवत आहेत. 


आरोप प्रत्यारोप
पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या बंगालला मिनी पाकिस्तान बनवतील असा गंभीर आरोप त्यांचा पक्ष सोडून भाजपामध्ये गेलेले बडे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांना धडा शिकविण्यासाठी ममता त्यांच्याविरोधात नंदीग्राममधून लढत आहेत. आता ममता यांनी जवळपास 14 वर्षे जुन्या घटनेचा डाव खेळला होता. तजमिनीच्या अधिग्रहनाविरोधातील ऐतिहासिक आंदोलनावेळी 14 मार्च 2007 ला पिता-पुत्राला माहिती न देता पोलीस नंदीग्राममध्ये येऊच शकत नव्हते, असा आरोप केला होता. हे तेच नंदीग्राम आहे, ज्या शेतकरी आंदोलनाद्वारे ममता बॅनर्जी आज राज्याच्या नेत्या बनल्या आहेत.

पश्चिम बंगालमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी; ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पिछाडीवर


काय होती घटना...
ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामयेथून शेतजमिन अधिग्रहण करण्याविरोधात आंदोलन सुरु केले होते. जानेवारी 2007 मध्ये सीपीएमचे आंदोलक आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. तर 14 मार्च 2007 या दिवशी नंदीग्राममध्ये 14 लोकांचा पोलीस फायरिंगमध्ये मृत्यू झाला.

Web Title: West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: Nandigram is heavy for 822 seats in 5 states, Mamata banerjee, suvendu adhikari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.