Puducherry Assembly Elections 2021 Latest NewsFOLLOW
Puducherry assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. पदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत.