Assembly Election 2021: निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 04:06 PM2021-04-16T16:06:17+5:302021-04-16T16:11:36+5:30

assembly election 2021: पाचही राज्यातून समोर येत असलेली कोरोनाची आकडेवारी धडकी भरवणारी आहे, असे सांगितले जात आहे.

five state assembly election rallies proved to be fatal corona speed increases and hike 45 percent deaths | Assembly Election 2021: निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ

Assembly Election 2021: निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ

Next
ठळक मुद्देनिवडणूक असलेल्या ५ राज्यांत कोरोनाचा विस्फोट५ राज्यांतील कोरोना मृत्यूदर ४५ टक्क्यांनी वाढलाकोरोनाची आकडेवारी धडकी भरवणारी

नवी दिल्ली: आताच्या घडीला देशभरात केवळ दोनच गोष्टींची सर्वाधिक चर्चा आहे. एक म्हणजे कोरोना आणि दुसरे म्हणजे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका. (assembly election 2021) मात्र, गेले अनेक दिवस ज्या गोष्टीची भीती होती, तीच खरी ठरताना दिसत आहे. गेल्या १५ दिवसांचा विचार केल्यास विधानसभा निवडणुका असलेल्या ५ राज्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. १ ते १४ एप्रिल या कालावधीत आसाममध्ये ५३२ टक्के, बंगालमध्ये ४२० टक्के, तामिळनाडूत १५९ टक्के, पुदुच्चेरीत १६५ टक्के, तर केरळमध्ये १०३ टक्क्यांनी कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (five state assembly election rallies proved to be fatal corona speed increases and hike 45 percent deaths )

गेल्या १५ दिवसांत निवडणुका असलेल्या पाच राज्यातील कोरोना मृत्यूचे प्रमाण ४५ टक्क्यांनी वाढल्याची माहिती मिळाली आहे. पश्चिम बंगालमधील ४ टप्प्यांचे मतदान अद्याप व्हायचे आहे. त्यामुळे येथील आकडा काही दिवसांनी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पाचही राज्यातून समोर येत असलेली कोरोनाची आकडेवारी धडकी भरवणारी आहे, असे सांगितले जात आहे. 

दिलासादायक! यंदा देशात सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

आसाममध्ये ५३२ टक्के कोरोना रुग्णवाढ

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत आसाममध्ये केवळ ५३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, फक्त ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र, १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत ३ हजार ३९८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर, १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याचाच अर्थ आसाममध्ये गेल्या १४ दिवसांमध्ये तब्बल ५३२ टक्क्यांनी कोरोना रुग्णसंख्या वाढली. 

बंगालमध्ये ४२० टक्के कोरोना रुग्णवाढ

पाच राज्यांतील निवडणुकांपैकी सर्वाधिक चर्चा आहे, ती पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेकांनी बंगालमध्ये तळ ठोकल्याचे पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीत कोरोना संसर्गालाही मोठा जोर आल्याचे चित्र आहे. १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत बंगालमध्ये ८ हजार कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत बंगालमध्ये ४१ हजार ९२७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून, १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना परिस्थिती गंभीर; निवडणूक आयोगाने बोलावली सर्वपक्षीय बैठक

पुदुच्चेरीमध्ये १६५ टक्के कोरोना रुग्णवाढ

पुदुच्चेरीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अन्य केंद्र शासित प्रदेशांच्या तुलनेत कमी होती. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत प्रतिदिन केवळ ५० नव्या रुग्णांची नोंद होत होती. १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत १४०० नवे कोरोना रुग्ण पुदुच्चेरीत आढळून आले होते. तर, ९ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला होता. मात्र, १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत ३ हजार ७२१ कोरोनाबाधितांची नोंद या ठिकाणी करण्यात आली. तर, १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 


तामिळनाडूत १५९ टक्के कोरोना रुग्णवाढ

तामिळनाडूमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना निवडणुकांच्या प्रचारसभांमुळे यात भर पडल्याचे पाहायला मिळत आहे. १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत तामिळनाडूमध्ये २५ हजार कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, १६३ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र, १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत कोरोनाबाधितांची संख्या ६५ हजारांच्या घरात गेली असून, याच दरम्यान २३२ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला. 

कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक; निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे निधन

केरळमध्ये १०३ टक्के कोरोना रुग्णवाढ

काही दिवसांपूर्वी केरळमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. देशभरात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असताना केरळमध्ये मात्र उच्चांकी आकडेवारी समोर येत होती. निवडणुकांतील प्रचारासभानंतर यात आणखीनच भर पडल्याचे सांगितले जात आहे. १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत केरळमध्ये ३० हजार ३९० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, १९९ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत केरळमध्ये तब्बल ६१ हजार ७९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून, याच दरम्यान २०४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 
 

Web Title: five state assembly election rallies proved to be fatal corona speed increases and hike 45 percent deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.