Video: घरकाम, मारहाण अन्..; 12 वर्षीय मुलीला पलंगात लपवले, सहा वर्षांपासून सुरू होता छळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 18:11 IST2026-02-04T18:10:10+5:302026-02-04T18:11:07+5:30
Assam Crime: मानवतेला काळीमा फासणारी घटना; सहा वर्षांपासून सुरू होता शारीरिक आणि मानसिक छळ!

Video: घरकाम, मारहाण अन्..; 12 वर्षीय मुलीला पलंगात लपवले, सहा वर्षांपासून सुरू होता छळ
Assam Crime:आसामच्या गुवाहाटी जिल्ह्यातून मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला नराधमांनी पलंगात कोंडून ठेवले होते. जिल्हा श्रम टास्क फोर्सने वेळेवर कारवाई करत मुलीची सुरक्षित सुटका केली असून, या रेस्क्यूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही धक्कादायक घटना गुवाहाटीतील पंजाबारी परिसरातील जुरिपार, घर क्रमांक 69 येथे घडल्याची माहिती आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये श्रम टास्क फोर्सची टीम पलंगात कोंडून ठेवलेल्या मुलीला बाहेर काढताना दिसत आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
घरगुती कामासाठी आणून अमानुष छळ
मिळालेल्या माहितीनुसार, अरिना लस्कर खातून नावाच्या महिलेने सुमारे सहा वर्षांपूर्वी या मुलीला घरगुती कामासाठी आपल्या घरी आणले होते. मात्र, त्यानंतर तिला सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला. स्थानिक नागरिकांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी प्रशासनाला कळवले. त्यानंतर जिल्हा श्रम टास्क फोर्स सक्रिय झाली आणि रविवारी सायंकाळी एका दंडाधिकाऱ्याच्या उपस्थितीत संबंधित घरावर छापा टाकण्यात आला.
A 13-year-old girl was rescued from horrific abuse in Panjabari after being found locked inside a divan storage box. The District Labour Task Force, with a magistrate present, raided the house of Amrin Akhtar Laskar (House No. 69, Juripar) on Sunday evening following local… pic.twitter.com/RUAkMl433K
— Ron Bikash Gaurav (@RonBikashGaurav) February 3, 2026
सुमारे 25 मिनिटे पलंगात कोंडलेली
छाप्याची माहिती आधीच मिळाल्याने संबंधित महिलेने मुलीला पलंगात लपवून ठेवले होते. सुमारे 25 मिनिटे मुलगी पलंगात बंद होती, अशी माहिती टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी दिली. श्रम टास्क फोर्स घरात पोहोचल्यावर महिलेने मुलीचे वडील तिला तीन-चार दिवसांपूर्वी घेऊन गेल्याचे खोटे सांगितले. मात्र, घरातील संशयास्पद हालचाली पाहून अधिकाऱ्यांनी तपासणीची परवानगी मागितली. सुरुवातीला महिलेने याला विरोध केला, पण अखेर तपासणी सुरू करण्यात आली.
तपासात धक्कादायक वास्तव उघड
घरातील एका खोलीत तपासणीदरम्यान मुलगी पलंगात कोंडलेली आढळली. ती अत्यंत घाबरलेली होती. तिला बाहेर काढल्यानंतर पाणी दिले गेले. शुद्धीवर येताच ती जोरजोरात रडू लागली. प्राथमिक चौकशीत मुलीने सांगितले की, तिला दीर्घकाळ मारहाण आणि अमानुष वागणूक दिली जात होती. जिल्हा श्रम टास्क फोर्सने मुलीला तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवले असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई होणार आहे.