शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! आंध्र प्रदेशमध्ये भेसळयुक्त दूध प्यायल्याने १६ जणांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 15:55 IST

आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. भेसळयुक्त दूध प्यायल्याने आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती अद्याप गंभीर आहे.

आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भेसळयुक्त दूध प्यायल्याने आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. लालाचेरुवू, चौदेस्वरनगर आणि स्वरूपनगर यांसारख्या भागात फेब्रुवारी महिन्यापासूनच लोक आजारी पडू लागले होते.

दूध प्यायल्यानंतर लोकांना उलट्या, पोटदुखी आणि किडनी फेल होणं यांसारख्या गंभीर समस्या जाणवू लागल्या. सुरुवातीला २२ फेब्रुवारी रोजी काही प्रकरणांची नोंद झाली, परंतु तपासणीत असं समोर आले की, एका स्थानिक डेअरी युनिटमधून पुरवठा करण्यात आलेल्या दुधात 'इथिलिन ग्लायकॉल' हा विषारी पदार्थ मिसळलेला होता. या भेसळीमुळे २० हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं, ज्यामध्ये लहान मुलं आणि वृद्धांचा समावेश होता. आतापर्यंत या घटनेतील मृतांचा आकडा १६ वर पोहोचला आहे, तर ३ रुग्ण अजूनही आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत.

नरसापुरम गावातील एका डेअरी युनिटमधून १०० हून अधिक कुटुंबांना दूध पोहोचवण्यात आलं. दूध प्यायल्यानंतर काही तासांतच ग्राहकांमध्ये गंभीर लक्षणं जाणवू लागली, त्यानंतर त्यांना डायलिसिस आणि व्हेंटिलेटर सपोर्टची गरज भासली. आरोग्य विभागाच्या तपासणीत दुधात इथिलिन ग्लायकॉल मिसळल्याची पुष्टी झाली आहे, हा पदार्थ किडनी आणि इतर अवयवांचं कायमस्वरूपी नुकसान करतो. अनेक रुग्णांमध्ये ब्लड यूरिया आणि सीरम क्रिएटिनिनची पातळी असामान्यपणे वाढलेली आढळली. हा पदार्थ प्रामुख्याने 'अँटी-फ्रीझ' म्हणून वापरला जातो आणि खाद्यपदार्थांमध्ये याची भेसळ करणं अत्यंत घातक आहे.

घटनेनंतर दुधाचा पुरवठा तातडीने थांबवण्यात आला असून बाधित भागात 'डोअर-टू-डोअर' सर्व्हे करण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संशयित दूध विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा विभागाने डेअरी युनिटला भेट देऊन दूध, दही, तूप आणि पाण्याचे नमुने घेतले आहेत. पशुसंवर्धन विभागाने पशुखाद्य आणि पाण्याचीही तपासणी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हैदराबादचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Adulterated Milk Kills 16 in Andhra Pradesh; Investigation Underway

Web Summary : Tragedy struck Andhra Pradesh as tainted milk claimed 16 lives. Ethylene glycol contamination caused severe health issues. Authorities are investigating the dairy unit, arresting suspects, and providing medical support.
टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशmilkदूधDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी