शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 09:13 IST

"खर्गें यांची काय इच्छा आहे, हे मला माहीत आहे. पण ती कधीही पूर्ण होणार नाही.”

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अर्थात आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. एनडीटीव्हीच्या एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले, “आरएसएसने देशाला दोन अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान दिले आहेत. आरएसएस एक असे संघटन आहे ज्याने माझ्यासारख्या लाखो तरुणांना देशहितासाठी काम करण्याची प्रेरणा दिली. त्यांनी देशभक्ती आणि शिस्तीचे मूल्य रुजवले.” तसेच, 'त्यांनी (खर्गे) बंदीची मागणी केली, पण त्यासाठी कोणतेही कारण दिले नाही,' असेही शाह म्हणाले. 

अमित शाह पुढे म्हणाले, “आरएसएसमधून आलेले दोन व्यक्ती या देशाचे पंतप्रधान झाल (अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी). या दोघांनाही देशाचे सर्वोत्तम पंतप्रधान मानले जाईल. देशाच्या विकासात आणि समाजाला योग्य दिशा देण्यात आरएसएसचे योगदान मोठे आहे. खर्गें यांची काय इच्छा आहे, हे मला माहीत आहे. पण ती कधीही पूर्ण होणार नाही.”

काय म्हणाले होते मल्लिकार्जुन खर्गे -दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना, “जर मोदी खरंच भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा सन्मान करत असतील, तर त्यांनी आरएसएसवर बंदी घालावी,” असे म्हटले होते.  एढेच नाही तर, “देशातील सर्व चुकांची आणि कायदा-सुव्यवस्थेच्या सर्व समस्यांसाठी भाजप आणि आरएसएस जबाबदार आहे,” असा आरोपही खर्गे यांनी केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमावेली काँग्रेसवर केलेल्या आरोपानंतर खर्गे यांनी हे विधान केले होते. काँग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल यांचा वारसा योग्यरित्या पुढे न नेल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Amit Shah responds to Kharge's call to ban RSS.

Web Summary : Amit Shah defended the RSS after Kharge's ban demand, highlighting its patriotic contributions and the two PMs it produced. He dismissed Kharge's wish as unachievable, while Kharge blamed BJP/RSS for problems, responding to Modi's criticism about Congress and Patel.
टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ