शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

'नागरिकत्व विधेयक मंजूर झाल्यास अमित शहांना अमेरिकेत बंदी घाला' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 15:48 IST

आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रतासंबंधितील अमेरिका कमिशनने देशाच्या लोकसभेत संमत करण्यात

नवी दिल्ली - भाजपाअध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019 मांडले होते. सोमवारी उशिरा लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 311 तर विरोधात 80 सदस्यांनी मतदान केले. या विधेयकाला काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. तर, या विधेयकाचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरही पहायला मिळत आहेत. अमेरिकेतील एका संस्थेनं हे विधेयक चुकीचं असल्याचं म्हटलंय.

आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रतासंबंधितील अमेरिका कमिशनने देशाच्या लोकसभेत संमत करण्यात आलेल्या नागरिकत्व विधेयकाला चुकीचं म्हटलंय. तसेच, जर हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले तर, गृहमंत्री अमित शहा यांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यात यावी, अशी मागणीही या समितीने केली आहे. या विधेयकानुसार, शेजारील तीन देश, पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांग्लादेश येथून 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारसी आणि ईसाई समुदायातील लोकांना नागरिकता देण्यात येणार आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत या विधेयकावर चर्चा झडली. 

अमेरिकेतील यूएस कमिशन फॉर इंटरनैशनल रिलिजस फ्रीडम (USCIRF) ने नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत विधान केले आहे. जर, भारतीय संसदेतील दोन्ही सभागृहात हे विधेयक संमत झाले, तर गृहमंत्री अमित शहांसह इतर प्रमुख नेत्यांना अमेरिकेत प्रवेशबंदी करा, अशी मागणी आयोगाने केली आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यामुळे USCIRF ने चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, नागरिकत्व विधेयकाच्या मतदानावेळी शिवसेना मतदानापासून तटस्थ राहण्याची भूमिका घेऊ शकली असती. शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केले हे योग्य नाही अशी नाराजी हुसेन दलवाईंनी बोलून दाखविली. त्यामुळे राज्यात काँग्रेसला सोबत घेणाऱ्या शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून येतंय.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAmericaअमेरिका