शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
3
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
4
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
5
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
6
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
7
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
8
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
9
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
10
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
11
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
12
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
13
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
14
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
15
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
16
Nashik: घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
17
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
18
Raid: सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
19
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
20
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! पत्नीकडे फ्रेंच किस मागून पतीने केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 12:46 IST

पती-पत्नीत काही कारणांमुळे वाद झाला. मात्र हा वाद मिटल्याचं भासवून पतीने पत्नीकडे फ्रेंच किस मागितला.

ठळक मुद्देफ्रेंच किस न करता पत्नीची जीभ कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.पत्नीची जीभ कापल्यानंतर पती फरार झाला आहे. त्यामुळे पोलीस आरोपी पतीचा शोध घेत आहेत. 

अहमदाबाद - पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याचा घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. असाच एक प्रकार अहमदाबादमध्ये घडला आहे. पती-पत्नीत काही कारणांमुळे वाद झाला. मात्र हा वाद मिटल्याचं भासवून पतीने पत्नीकडे फ्रेंच किस मागितला. पण फ्रेंच किस न करता पत्नीची जीभ कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. तस्लीम असं पीडित महिलेचं नाव आहे. या प्रकरणी महिलेने पतीविरोधात वेजलपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पत्नीची जीभ कापल्यानंतर पती फरार झाला आहे. त्यामुळे पोलीस आरोपी पतीचा शोध घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्लीमचं पतीसोबत काही कारणांमुळे रोज भांडण होत असे. त्याचप्रमाणे बुधवारी ही भांडण झालं. मात्र पतीने ते भांडण तिला विसरायला सांगितलं आणि भांडण मिटवल्याचं भासवलं. तसेच तस्लीमकडे फ्रेंच किस मागितला. पती खरंच भांडण विसरण्याच्या तयारीत आहे असा समज तस्लीमचा झाला आणि ती किस द्यायला तयार झाली. मात्र त्यानंतर जे घडलं ते पाहून तिला धक्काचं बसला.

पतीन तस्लीमची जीभ हातात पकडली आणि कापली. तसेच घराचा दरवाजा बाहेरून लावून तो पसार झाला. या घटनेनंतर तस्लीमने आपल्या बहिणीला फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला. तसेच आरडाओरडा करत शेजाऱ्यांकडे मदत मागितली. शेजाऱ्यांनी तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. एसव्हीपी रुग्णालयात तस्लीमवर उपचार करण्यात येत आहेत. तसेच जीभेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

काही दिवसांपूर्वी बांग्लादेशातही अशीच एक घटना समोर आली होती. जेवणात केस आढळला या रागात पतीने पत्नीचे केस कापले. त्याने पत्नीचं टक्कल केलं. बांग्लादेशातील जयपूरहटमधील ही घटना आहे. 35 वर्षीय बबलू मंडल याला पोलिसांनी अटक केली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बबलूच्या पत्नीने त्याला दूध आणि भात दिला होता. यात एक केस आढळला. या रागात त्याने पत्नीचे सर्व केस कापले. ब्लेडच्या मदतीने त्याने तिचं जबरदस्तीने टक्कल केलं'. गावातील लोकांनीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.
 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPoliceपोलिस