शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 23:59 IST

Air India Flight AI171 Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात बांसवाडा जिल्ह्यातील पाच जणांचे अख्खे कुटुंब उध्वस्त झाले आहे.

एअर इंडियाच्या विमान अपघातातील मृतांबाबत आता विविध ठिकाणांहून हृदय हेलावून टाकतील अशा गोष्टी समोर येत आहेत. या विमानात बसण्यापूर्वी अनेकांचे सेल्फी, फोटो सोशल मीडियावर येत आहेत. यापैकीच एक आहे तो डॉ. कोमी व्यास यांचा. त्यांनी महिन्यापूर्वीच नोकरीचा राजीनामा दिला होता व लंडनला पती व तीन मुलांसह कायमचे शिफ्ट होत होते. परंतू, त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले. 

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात बांसवाडा जिल्ह्यातील पाच जणांचे अख्खे कुटुंब उध्वस्त झाले आहे. प्रतीक जोशी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह विमानातून प्रवास करत होते. प्रतीक हे सहा वर्षांपूर्वीच लंडनला स्थलांतरीत झाले होते. परंतू, त्यांची पत्नी डॉ. कोमी व्यास व तीन मुले इथेच होती. आता ते कायमचे लंडनला राहण्यास जात होते. यामुळे कोमी यांनी उदयपूरमधील पॅसिफिक हॉस्पिटल उमरदा येथे देत असलेल्या सेवेचा राजीनामा दिला होता. दोन दिवसांपूर्वीच त्या नोकरीतून मुक्त झाल्या होत्या. परंतू, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. 

प्रद्युत जोशी, मिराया जोशी आणि नकुल जोशी या मुलांसह हे दोघे दाम्पत्य लंडनला निघाले होते. यात जुळी मुले आहेत. विमानात बसताना या दोघांनी मुलांसोबत सेल्फी काढले होते. ते त्यांनी सोशल मीडियावर आणि नातेवाईकांना पोस्ट केले होते.  संपूर्ण कुटुंब लंडनमध्ये स्थायिक होण्याच्या उद्देशाने या विमानात बसले होते. प्रतीकने बऱ्याच दिवसांपासून त्याची पत्नी आणि मुलांनाही लंडनला घेऊन जाण्याची योजना आखली होती. तिथे नव्या आयुष्याला सुरुवात करणार होते. विमान अपघाताने त्यांची स्वप्ने क्षणात उध्वस्त करून टाकली आहेत. 

राजस्थानच्या १० प्रवाशांचा मृत्यू...या विमान दुर्घटनेत जोशी कुटुंबासह राजस्थानच्या दहा जणांचा मृत्यू झाला आहे. उदयपूरमधील चार आणि बालोत्रा ​​येथील खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. उदयपूर शहरातील संगमरवरी व्यापारी पिंकू मोदी यांचा २४ वर्षीय मुलगा शुभ आणि २२ वर्षीय मुलगी शगुन मोदी यांच्याव्यतिरिक्त, जिल्ह्यातील रुंदेडा गावातील वरदी चंद मेनारिया आणि प्रकाश मेनारिया यांचाही मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाdoctorडॉक्टरahmedabadअहमदाबाद