शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या हॉलमध्ये घुसला बिबट्या, वऱ्हाड्यांची तारांबळ, वधू पळाली, वराने खिडकीतून उडी मारली, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:04 IST

Leopard Entered The Wedding Hall: लग्नात विघ्न अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय नुकताच उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे झालेल्या एका विवाह सोहळ्यादरम्यान उपस्थितांना आला. येथे लग्न समारंभ सुरू असतानाच लग्नाच्या हॉलमध्ये अचानक बिबट्या घुसल्याने एकच गोंधळ उडाला.

लग्नात विघ्न अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय नुकताच उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे झालेल्या एका विवाह सोहळ्यादरम्यान उपस्थितांना आला. येथे लग्न समारंभ सुरू असतानाच लग्नाच्या हॉलमध्ये अचानक बिबट्या घुसल्याने एकच गोंधळ उडाला. नटून थटून लग्नासाठी तयार असलेली वधू मेत्रिणींसह हॉलमधून बाहेर पडली. तर वरानेही हॉलच्या खिडकीतून उडी मारून जीव वाचवला. वऱ्हाडी मंडळींनीही जीव मुठीत धरून हॉलमधून काढता पाय घेतला. चवताळलेल्या बिबट्याने पकडण्यासाठी आलेल्या एका वन अधिकाऱ्यालाही जखमी केले. अखेर रात्रभर चाललेल्या मोहिमेनंतर आज पहाटे ४ च्या सुमारास या बिबट्याला पकडण्यात यश आले.

ही घटना लखनौमध्ली पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमएम मॅरेज लॉनमध्ये घडली. येथे बुधवारी रात्री एक लग्नसोहळा सुरू होता. तेव्हा रात्री १०.३० च्या सुमारास एका पाहुण्याने दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बिबट्याला पाहिले आणि खाली उडी मारली. त्यात तो जखमी झाला. तर बिबट्या आल्याचं समजताच लग्न सोहळ्यात गोंधळ उडाला.   पाहुणे मंडळी आणि लग्नासाठी आलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले. तसेच बिबट्या आल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. ही माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक लग्न स्थळी दाखल झालं. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. यादरम्यान, खवळलेल्या बिबट्याने एका वन अधिकाऱ्यालाही जखमी केले. अखेरीस रात्रभर सुरू असलेल्या मोहिमेनंतर वनअधिकाऱ्यांनी पहाटे या बिबट्याला पकडले.

दरम्यान, जखणी वनअधिकाऱ्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भागात मागच्या काही आठवड्यांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नleopardबिबट्याViral Videoव्हायरल व्हिडिओlucknow-pcलखनऊ