शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त विमानात ४ क्रू मेंबर्स अन् ५ प्रवासी मराठी, केबिन क्रू अपर्णा महाडिक तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 07:24 IST

Ahmedabad Air India Flight AI171 Crash : एअर इंडियाच्या अपघातग्रस्त झालेल्या विमानात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये महाराष्ट्रातील ९ जणांचा समावेश आहे. यात ४ जण हे क्रू मेंबर असून ५ जण लंडनला निघाले होते.

अहमदाबाद - एअर इंडियाच्या अपघातग्रस्त झालेल्या विमानात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये महाराष्ट्रातील ९ जणांचा समावेश आहे. यात ४ जण हे क्रू मेंबर असून ५ जण लंडनला निघाले होते.   

अपघातग्रस्त विमानातील १२ क्रू मेंबर्सपैकी चार क्रू मेंबर हे मराठी आहेत. त्यातील अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचा सख्खा भाचा अमोल यांच्या पत्नी आहेत. त्या एअर इंडियात सीनियर केबिन क्रू म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती अमोल हेही एअर इंडियात पायलट म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय, मैथिली पाटील, दीपक पाठक व रोशनी सोनघरे हे क्रू मेंबरही मराठी आहेत. मैथिली पाटील ही पनवेल (जि. रायगड) येथील असून ती एअर होस्टेस होती. तर डोंबिवलीतील (जि. ठाणे) येथील रोशनी सोनघरे ही क्रू मेंबर होती. तसेच, दीपक पाठक (रा. बदलापूर, जि.ठाणे) हेही केबिन क्रू मेंबर म्हणून विमानात कर्तव्यावर होते.

तसेच, महादेव पवार आणि आशाबेन पवार हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील दाम्पत्य लंडनमध्ये राहणाऱ्या मुलाकडे निघाले होते. याशिवाय, नागपूरमधील मनीष नेमचंद कामदार यांची मुलगी यशा कामदार-मोढा, तिचा छोटा मुलगा रुद्र आणि सासू रक्षा मोढा हेही लंडनला निघाले होते. परंतु, या दुर्घटनेत त्यांच्यावर काळाने घाला घातला. 

ही एक हृदयद्रावक आपत्ती आहे. मी त्यांच्या दु:खात सहभागी असून, मी अपघातग्रस्त लोकांसाठी शोक व्यक्त करते. अतीव दुःखाच्या या क्षणी राष्ट्र त्यांच्यासोबत उभे आहे. - द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

अहमदाबादमधील दुर्घटनेने धक्का बसला आहे. हे दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. मी सर्व बाधित लोकांबाबत शोक व्यक्त करतो. बाधित लोकांना मदत करण्यासाठी कार्यरत मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात मी आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

विमान योग्यरीत्या तपासले गेले नव्हते का?विमान सुरक्षा सल्लागार जॉन एम. कॉक्स यांनी सांगितले की, पहिला प्रश्न असा पडतो तो म्हणजे विमान उड्डाणासाठी सुसज्ज होते का? छायाचित्रे पाहता विमानाचे स्लॅट्स आणि फ्लॅप्स योग्य स्थितीत नव्हते, असे वाटते. विमानाचे नाक वर जाताना आणि नंतर खाली झुकताना दिसते. याचा अर्थ विमानाला पुरेशी उंची घेता आली नाही, असे दिसते. अशा जेट विमानांमध्ये बॅकअप यंत्रणा असतात, जसे की एका इंजिनवरही विमान वर जाऊ शकते. त्यामुळे हा अपघात अजूनच आश्चर्यकारक वाटतो, असे कॉक्स यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाGujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्र