शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त आदिवासींचा ठिय्या

By admin | Updated: August 25, 2016 00:46 IST

पोलीस बंदोबस्त : आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू

सटाणा : तालुक्यातील हरणबारी आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईक व शेकडो आदिवासी बांधवांनी आश्रमशाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई करा या मागणीसाठी आश्रमशाळेसमोर तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. आक्र मक झालेल्या आदिवासी बांधवांचा संताप पाहता १०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त शाळेत तैनात करण्यात आला होता.बागलाण तालुक्यातील हरणबारी शासकीय आश्रमशाळेत तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत असलेली लीला हिरामण गांगुर्डे (वय ८,रा.ब्रिंदावन पाडे,मानूर) ही विद्यार्थिनी दोन दिवसांपूर्वी आश्रमशाळेत आजारी पडली. तिच्यावर मुल्हेर येथील आरोग्यकेंद्रात उपचार देखील करण्यात आले.मात्र तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला आश्रमशाळा प्रशासनाने सटाणा ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले मात्र तिला अतिसार व वाणत्या जास्त प्रमाणात झाल्याने तिचा मृत्यू झाला.या संपूर्ण घटनेत जायखेडा पोलिसांनी देखील सावध भूमिका घेत मयत विद्यार्थिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवला. काल सायंकाळी लीला हिच्यावर मानूर येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर आज सकाळी तिच्या नातेवाईकांसह बागलाणच्या आदिवासी पट्ट्यातील आदिवासी बांधवांनी हरणबारी आश्रमशाळेवर धाव घेत शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत दोषी अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत तब्बल तीस तास शेकडो आदिवासींनी ठिय्या आंदोलन केले.घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मात्र आदिवासी बांधवांची संख्या पाहता त्यांनी सटाणा, वडनेर खाकुर्डी व मालेगाव येथील रिझर्व पोलीस फोर्स घटनास्थळी पाचारण केला. घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदार सुनील सैंदाणे, पोलीस उपाधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर,पोलीस उपनिरीक्षक के पी घायवट यांच्यासह १०० हून अधिकपोलिसांचा फौजफाटा हरणबारी आश्रमशाळेवर दाखल झाला. यावेळी बागलाण तालुका शिवसेना तालुका प्रमुख सुभाष नंदन, प्रदीप कांकरिया, डॉ.राजेंद्र पवार, आबा बच्छाव, सीताराम साळवे, आदिवासींचे नेते मधुकर चौधरी, भटू महाले, पोपटराव गवळी यांनी संतप्त आदिवासी बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र दोषींवर कारवाई केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्याने तहसीलदार सैंदाणे व डीवायएसपी यांनी मध्यस्थी करत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलकांनी नरमाईची भूमिका घेतली. (वार्ताहर)