शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापलिकेच्या सर्व शाळांमध्ये लवकरच अक्षयपात्र योजना राबविणार: सरीता सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:25 IST

नाशिक - महापालिका शिक्षण विभागामार्फत ९० शाळा चालविल्या जातात. त्यात सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. सामान्य आणि समाजातील निन्मस्तरावरील विद्यार्थी या शाळांमध्ये येतात. त्या दृष्टीने या शाळांमध्ये अनेक सुधारणा करण्याचा मानस महापालिकेच्या शिक्षण समितीच्या नवनिर्वाचीत सभापती प्रा. सरीता सोनवणे यांनी व्यक्त केला आहे

ठळक मुद्देशाळा डिजीटल करण्यावर भर खासगी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी सेमी इंग्रजीचे अधिकाधिक वर्ग

नाशिक - महापालिका शिक्षण विभागामार्फत ९० शाळा चालविल्या जातात. त्यात सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. सामान्य आणि समाजातील निन्मस्तरावरील विद्यार्थी या शाळांमध्ये येतात. त्या दृष्टीने या शाळांमध्ये अनेक सुधारणा करण्याचा मानस महापालिकेच्या शिक्षण समितीच्या नवनिर्वाचीत सभापती प्रा. सरीता सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यातच त्यांची सभापती म्हणून निवड झाली आहे. त्यांनी सुत्रे घेतल्यानंतर विविध योजना राबविण्याचा मनोदय केले. याशिवाय महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्राथमिक सुविधा देतानाच शाळा डिजीटल करण्यावर भर देण्यात येणार आहे.प्रश्न: मनपा शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षात कोणती खास योजना राबविणार आहात?प्रा. सोनवणे: मला शिक्षण क्षेत्राचा चांगला अनुभव आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये येणारा वर्ग तळागाळातील असतो. शासनाने पटसंख्या वाढविण्यासाठी पोषण आहार योजना दिली असून ती चांगली आहे. त्यामुळे अक्षयपात्र योजना राबविण्याचा मानस आहे. त्यात बचत गटांना सामावून घेता येईल का याचा विचार करणार आहे. त्याच प्रमाणे महापालिकेच्या सर्व शाळांना भेटी देणार असून त्यासंदर्भात सुरूवात देखील झाली आहे. ज्या शाळांना कंपाऊंड नाही तसेच अन्य सुविधा नाहीत, त्यांना त्या प्राधान्याने देण्यात येणार आहे.प्रश्न: शाळांसाठी कोणत्या नव्या योजना आहेत?प्रा. सोनवणे: मला सभापती म्हणून फार कमी कालावधी मिळाला आहे परंतु तरीही मी त्यात अनेक नविन योजना राबविणार आहे. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार सर्व शाळा डिजीटल करण्याचा मानस आहे. त्यासाठी या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येणार आहे. शाळांमधील शिकवणे तसे उपस्थिती यासंदर्भातील सर्व माहिती शिक्षण विभागात मिळू शकेल. त्यामुळे मुलांच्या अध्यापनाकडे लक्ष देता येईल. याशिवाय खासगी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी सेमी इंग्रजीचे अधिकाधिक वर्ग सुरू भर देण्यात येणार आहे.प्रश्न: मुलांच्या विकासासाठी काही योजना आहेत काय?प्रा. सोनवणे: गरीब मुलांचा शैक्षणिक विकास होण्यासाठी मुलांसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्याचा विचार आहे. त्याच प्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देताना केवळ मागसवर्गीयांनाच ते देण्याची तरतूद आहे परंतु अशाप्रकारे भेदाभेद न करताच सर्व मुलांना गणवेश देण्यात येतील. मुलांच्या कलागुणांचा विकास करण्यासाठी अटल वक्तृत्व स्पर्धा पुन्हा सुरू करण्यात येईल. तसेच क्रीडा महोत्सव देखील सुरू करण्यात येणार आहे.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाEducationशिक्षण