शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

समाजाभिमुख सिद्धांतांचा राज्यकर्त्यांना विसर

By admin | Updated: March 18, 2015 00:33 IST

अनिल सद्गोपाल : ‘शिक्षणाचे माध्यम आणि बाजार’ यावर विश्लेषण

नाशिक : भारतीयांचा मातृभाषेविषयीचा विश्वास संपुष्टात आणून इंग्रजांनी सुमारे दीडशे वर्षे भारतावर सत्ता भोगली. दरम्यानच्या काळात इंग्रजी भाषा, इंग्रजी विचारधारा, इंग्रजी जीवनशैलीचे प्रस्थ वाढविण्याचा त्यांनी पूरेपूर प्रयत्न केला. त्याचा प्रभाव आजही भारतात प्रकर्षाने जाणवतो, हे खेदाने सांगावे लागत आहे. ब्रिटिश साम्राज्यवादापुढे भारतीय महान नेत्यांनी मांडलेल्या शिक्षणशास्त्राविषयीच्या मूळ समाजाभिमुख प्रगतिशील सिद्धांतांचाही आपल्या देशाच्या राज्यकर्त्यांना विसर पडला असल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. अनिल सद्गोपाल यांनी केले.शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच व एस. एस. जोशी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून सद्गोपाल बोलत होते. हुतात्मा स्मारकात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी ‘भाषिक विविधता, शिक्षणाचे माध्यम व बाजार’ या विषयावर बोलताना ते म्हणाले, इंग्रजी भाषेशिवाय आधुनिक विचार अन्य भाषांमधून मांडण्याचे सामर्थ्य नसल्याचा विचार १८३५ साली लॉर्ड मॅकेले याने पुढे आणला. त्याने या विचाराने सर्वप्रथम भारतीयांचे मातृभाषेशी नाते तोडले. भारतातील सर्व भाषा इंग्रजी भाषेसमोर भारतीयांकडून दुय्यम समजल्या जाऊ लागल्या आहेत. एकूणच आजच्या या आधुनिकतेच्या युगात भारतीयांना आपापल्या मातृभाषेवरचा विश्वासही उडाला असल्याचे सद्गोपाल यांनी सांगितले. दरम्यान, मातृभाषेविषयीचा अभिमान आणि विश्वास अधिक बळकट करण्यासाठी महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड यांच्यासारख्या महान नेत्यांच्या साहित्याचा अभ्यास गरजेचा असल्याचा सल्ला त्यांनी देत त्यांचे मातृभाषेविषयीचे प्रेम अधोरेखित करणारे विविध दाखलेही सांगितले. आजदेखील इंग्रज साम्राज्यवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरून कायम ठेवला जात असून, त्याला स्थानिक राज्यकर्तेही हातभार लावत आहेत. त्यामुळेच शिक्षणक्षेत्रातही भांडवलशाही फोफावत चालली असल्याचे सद्गोपाल यावेळी म्हणाले. व्यासपीठावर प्रदीपकुमारदास गुप्ता, छाया देव, श्रीधर देशपांडे, अ‍ॅड. संतोष म्हस्के, सचिन मालेगावकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)