शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश प्रभुणे : ‘गुरुचरित्र महिमा’ पुस्तकाचे प्रकाशन

By admin | Updated: December 18, 2014 22:46 IST

गुरू ही व्यक्ती नव्हे तत्त्व

नाशिक : गुरू ही व्यक्ती नव्हे, तर तत्त्व असते. जन्म-मरणाच्या फेऱ्यांतून, लक्ष-लक्ष योनींमधून शिष्याला फक्त सद्गुरूमुळेच मुक्तता मिळू शकते. गुरूचरणी मन व बुद्धी अर्पण करणारे शिष्य हे भगवंतालाही प्रिय असतात, असे प्रतिपादन प्रकाश प्रभुणे महाराज यांनी केले. कवी हेमचंद्र पिंपरीकर रचित ‘श्री गुरुचरित्र महिमा-काव्य’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रभुणे महाराज यांच्या हस्ते कुसुमाग्रज स्मारक येथे झाले, तेव्हा ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत खैरनार होते. प्रभुणे म्हणाले की, गुरुचरित्र हा मुळात काव्यमय, ओवीबद्ध ग्रंथ असून, त्याचे काव्याच्या रूपात सुलभीकरण या ग्रंथात करण्यात आले आहे. तो वाचल्याने मुलांना गुरू, गुरूतत्त्व, सद्गुरू यांची जवळून ओळख होणार आहे. गुरूकडे शरीराच्या पलीकडे जाऊन पाहायला हवे. शिष्याची निष्ठा, श्रद्धा प्रखर असल्यास गुरूचेही काही चालत नाही. महाभारतातील एकलव्याच्या कथेवरून हेच स्पष्ट होते. अंघोळीने शरीरशुद्धी, स्तोत्राने मन:शुद्धी, तर ग्रंथाने बुद्धीशुद्धी होते. गुरूची ओळख करून देणाऱ्या अशाच ग्रंथाची निर्मिती कवी पिंपरीकर यांनी केली असल्याचेही ते म्हणाले. वसंत खैरनार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. गुरुचरित्राचे सुबोध, रसाळ निरूपण करण्यात आले असून, सदर लेखन हे अंत:प्रेरणेतून आल्याचे ते म्हणाले. गुरुचरित्र हा आत्मिक, भावनिक उन्नती करणारा ग्रंथ असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वाती येवले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)