नाशिकरोडच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 17:26 IST2018-08-13T17:25:46+5:302018-08-13T17:26:09+5:30

नाशिक : सामनगाव रोडवरील जयप्रकाशनगर परिसरातील गजानन महाराज मंदिराशेजारील जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नाशिकरोड पोलिसांनी रविवारी (दि़१२) छापा टाकून चौघा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले़ या जुगा-यांकडून साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे़

 Police raid on the gambling area of ​​Nashik Road | नाशिकरोडच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

नाशिकरोडच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

ठळक मुद्देसामनगाव रोडवरील जयप्रकाशनगर ; जुगाराच्या साहित्यासह रोकड जप्त

नाशिक : सामनगाव रोडवरील जयप्रकाशनगर परिसरातील गजानन महाराज मंदिराशेजारील जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नाशिकरोडपोलिसांनी रविवारी (दि़१२) छापा टाकून चौघा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले़ या जुगा-यांकडून साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे़

जयप्रकाशनगर भागातील गजानन मंदिराच्या बाजूला अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता संशयित संजय बाळासाहेब भंडारे (२९), सचिन विष्णू जगताप (३०), विजय लक्ष्मण पवार (तिघे रा. जयप्रकाशनगर, सामनगाव रोड) व निवृत्ती काशीनाथ कांबळी (३२, रा. भागवत गल्ली, देवळालीगाव) हे जुगार खेळत होते़ पोलिसांनी या संशयितांकडून जुगाराच्या साहित्यासह ६१० रुपयांची रोकड जप्त केली आहे़

या प्रकरणी पोलीस शिपाई वाजे यांच्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, या जुगा-यांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे़

Web Title:  Police raid on the gambling area of ​​Nashik Road