शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पेस्ट कंट्रोल ठेक्याला अटी-शर्तींची मेख

By admin | Updated: January 16, 2015 23:50 IST

कठोर नियमावली : येत्या महासभेत मान्यतेसाठी येणार

नाशिक : धूर व औषध फवारणी तथा पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला गेल्या वर्षभरात तेरा वेळा मुदतवाढीचा प्रश्न वादग्रस्त ठरल्यानंतर महापालिका आयुक्तांनी नव्याने ठेका देण्यासंबंधी निविदा प्रक्रिया राबविताना कठोर नियमावली तयार करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. सदर नियमावलीचे कामकाज अंतिम टप्प्यात असून, येत्या महासभेत ती मान्यतेसाठी ठेवण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने पेस्ट कंट्रोलबाबत नवी मुंबईच्या कामकाजाची पाहणी केल्यानंतर आता सुरत शहरातील कामकाजाची पाहणी करण्याचे ठरविले आहे.शहरात डेंग्यूने थैमान घातले त्यावेळी डास प्रतिबंधक धूर व औषध फवारणी होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांसह सदस्यांकडून वाढल्या होत्या. महापालिकेने पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराला मुदत संपल्यानंतर कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता वर्षभरात तब्बल तेरा वेळा मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीला सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवित नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी महासभांमध्ये केली होती. याशिवाय आयुक्तांनी स्थायी समिती व महासभांवर सदरचा मुदतवाढीचा प्रस्ताव न आणता परस्पर बिले अदा करण्यालाही विरोधी पक्षनेत्यासह सदस्यांनी आक्षेप घेतला होता. मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समिती सभेतही पुन्हा मुदतवाढ देण्यास सभागृहाने विरोध दर्शविला होता आणि पंधरा दिवसांत नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची सूचना केली होती. पेस्ट कंट्रोलबाबत सदस्यांच्या असलेल्या तीव्र भावना आणि एकूणच राबविली जाणारी प्रक्रिया लक्षात घेता महापालिका आयुक्तांनी निविदा प्रक्रियेसाठी नियमावली बनवताना कठोर अटी-शर्ती टाकण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने नियमावली तयार केली असून, ती येत्या महासभेवर मान्यतेसाठी ठेवली जाण्याची शक्यता आहे. नियमावलीत प्रामुख्याने संबंधित ठेकेदाराला जीपीएस यंत्रणा बंधनकारक करण्यात आली असून, दंडाची तरतूद वाढविण्यात आली आहे. याशिवाय जीपीएस यंत्रणेद्वारे लॉगबुक भरल्याशिवाय ठेकेदाराला बिल अदा होणार नाही, आदिंसह काही अटी-शर्तींची मेख मारून ठेवण्यात आली. त्यामुळे निविदा दाखल करणाऱ्या ठेकेदारावर पूर्ण नियंत्रण महापालिकेचे असणार आहे. (प्रतिनिधी)