शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

अर्पण रक्तपेढीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

By admin | Updated: September 11, 2016 01:59 IST

अर्पण रक्तपेढीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 नाशिक : आंतरराष्ट्रीय रक्तसंक्रमण संस्थेच्या वतीने दुबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत अर्पण रक्तपेढीला हॅरोल्ड गन्सन फेलोशिप पुरस्काराने गौरविण्यात आले. रक्तपेढीचे डॉ. शशिकांत पाटील यांनी संस्थेचे अध्यक्ष रवि रेड्डी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.दुबईत दि. ३ ते ८ सप्टेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी भारतातून पाच संशोधकांची निवड करण्यात आली होती. त्यात अर्पण रक्तपेढीचे डॉ. शशिकांत पाटील यांचा समावेश होता. अर्पण रक्तपेढीत ८० टक्के पेक्षा जास्त नियमित रक्तदान करणारे रक्तदाते आहेत. नियमित रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे रक्त हे अतिसुरक्षित असते व त्या रक्तपिशव्यांमध्ये रक्तसंक्रमणामुळे होणाऱ्या एचआयव्ही, कावीळ, बी आणि सी यांचे प्रमाण अतिशय नगण्य असते, हे सिद्ध झाले आहे. तसेच नियमित नॅट टेस्टेड रक्त पुरवठा केल्यामुळे वारंवार रक्ताची गरज असणाऱ्या रक्ताचा कर्करोग, थॅलेसेमियापीडित रुग्णांना सुदृढ ठेवण्यात यश आले आहे. नॅट टेस्टेड रक्त हे अतिसुरक्षित असते हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. या संशोधनात गेल्या पाच वर्षांपासून नियमित रक्तदान करणाऱ्या १ लाख २० हजार ६७ रक्तदात्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी अर्पण रक्तपेढीला या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.