शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

व्हीलचेअरमुळे दिव्यांग पोहोचले मतदान केंद्रांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 17:13 IST

नाशिक : दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सुविधांमुळे दिव्यांगांचा मतदानप्रक्रियेतील सहभाग वाढला असल्याचे ...

नाशिक : दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सुविधांमुळे दिव्यांगांचा मतदानप्रक्रियेतील सहभाग वाढला असल्याचे दिसून आले. मॅपिंग करण्यात आलेल्या दिव्यांग मतदारांना आवश्यकतेनुसार व्हीलचेअर पुरविण्यात आल्याने मतदान केंद्रांपर्यंत पोहोचून दिव्यांगांना मतदान करणे सुलभ झाले.दिव्यांग मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दिव्यांगांना अनेकविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार दिव्यांगांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी सुमारे ४५० व्हीलचेअर्स आणि वाहनांची व्यवस्था असल्याने दिव्यांग बांधव मतदान केंद्रांवर पोहोचू शकले. जिल्ह्यातील काही भागात दिव्यांगांना आणण्यासाठी शासनाचे वाहन पाठविण्यात आले तर सेक्टर आॅफिसरच्या गाडीमधूनदेखील दिव्यांग मतदार मतदानासाठी आले. मागणी करण्यात आल्यानुसार दिव्यांगांना आणण्यासाठी व्हीलचेअर्सदेखील पाठविण्यात आल्या.अनेक सेवाभावी संस्थांनीदेखील व्हीलचेअरची सुविधा पुरवून दिव्यांग मतदारांना सहकार्य केले. शहरातील उर्दू हायस्कूल येथे सेवाभावी संस्थांच्या अनेक कार्यकर्त्यांनी केंद्रावर आलेल्या दिव्यांग मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचविले. केंद्रातील प्रवेशद्वारावर रॅम्पची व्यवस्था करण्यात आली होती. तर अंध मतदारास एक मदतनीस बरोबर नेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यांच्यासाठी ब्रेल मतपत्रिकादेखील देण्याची व्यवस्था करण्यात आली.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक