नाशकात पाच हजार ३४८ विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:52 IST2019-11-17T14:45:55+5:302019-11-17T14:52:29+5:30

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी दहावीत शिक्षक असलेल्या विद्यार्थ्यांना प्रविष्ठ होता येते. राज्यभरातून एकूण ९४ हजार ५१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून नाशिक जिल्ह्यातील १८ परीक्षा केंद्रावर सुमारे ५ हजार ३४८ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा दिली.

Nashik: Five thousand students passed National Knowledge Test in Nashik | नाशकात पाच हजार ३४८ विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा

नाशकात पाच हजार ३४८ विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा

ठळक मुद्देजिल्ह्यातील १८ केंद्रावर प्रज्ञाशोध परीक्षा पाच हजार ३४८ विद्यार्थ्यांची कसोटी बौद्धीक व शालेय क्षमतेची चाचणी

नाशिक : जिल्ह्यातील १८ परीक्षा केंद्रावर रविवारी (दि.१७) जिल्हाभरातून सुमारे ५ हजार ३४८ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेला जिल्हाभरातून ५ हजार ५९६ विद्यार्थ्यांनी नियमित व ८ विद्यार्थ्यांनी विलंबशुल्कासह मूदतीत नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ३४८ विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थिती लावली,तर १९६ विद्यार्थ्यांनी मात्र या परीक्षेला दांडी मारल्याची माहिती सुत्रांनी दिली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी दहावीत शिक्षक असलेल्या विद्यार्थ्यांना प्रविष्ठ होता येते. राज्यभरातून एकूण ९४ हजार ५१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून या सुमारे ७ हजार ९० शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापूर्वी राज्यभरातून ८६ हजार २८१ विद्यार्थी बसले होते. यातील २६१ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे. नाशिक जिल्ह्यात यावर्षी  वेगवेगळ््या १८ परीक्षा केंद्रावर जिल्हाभरातील सुमारे ५ हजार ३४८ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा दिली. तर १९६ विद्यार्थ्यांनी मात्र या परीक्षेला दांडी मारली. परिक्षेचा पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० यावेळत बौद्धिक क्षमचा चाचणी तर दुसरा पेपर दुपारी १.३० ते ३. या वेळेत शालेय क्षमता चाचणीचा घेण्यात आला. दोन्ही पेपरमध्ये प्रत्येकी १०० गुणांचे शंभर प्रश्न विचारण्यात आले होते. दरम्यान, या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर एक महिन्याच्या कालावधीत जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Nashik: Five thousand students passed National Knowledge Test in Nashik