शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने घेतला पुन्हा पोलिसाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:06 IST

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पुन्हा त्यांच्या थुंकीचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले असता तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

ठळक मुद्देफणफणून ताप चढला आणि श्वासोच्छवासाला त्रास ग्रामिण पोलीस दलातील दुसऱ्या कर्मचा-याचा बळी

नाशिक : दिवस-रात्र एक करून कोरोनाशी थेट मुकाबला करणाऱ्या पोलीस दलावर पुन्हा शोककळा पसरली. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार यांची अखेर कोरोनासोबतची झुंज सोमवारी (दि.२५) पहाटे संपली. त्यांच्या रूपाने कोरोनाने ग्रामिण पोलीस दलातील दुसऱ्या कर्मचा-याचा बळी घेतला. याप्रकरणी जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनीही शोक व्यक्त करत आपल्या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचा-यास आदरांजली वाहिली.मालेगाव येथे पोलीस बंदोबस्तावर असलेले यांना बंदोबस्ताचा कालावधी पुर्ण होताच आठवडाभर क्वारंटाइन करण्यात आले. दरम्यान, त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला होता. त्यानंतर नाशिकमधील राहत्या घरी मागील आठवड्यात ते दाखल झाले; मात्र चार दिवसांपुर्वी पुन्हा त्यांना फणफणून ताप चढला आणि श्वासोच्छवासाला त्रास जाणवू लागल्याने त्यांना मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पुन्हा त्यांच्या थुंकीचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले असता तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर  यांना उपचारासाठी मविप्रच्या रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि सोमवारी पहाटे त्यांचे रुग्णालयात दुर्दैवी निधन झाले.  त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू