शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
2
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
3
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
4
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
5
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
6
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
7
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
8
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
9
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
10
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
11
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
12
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
13
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
14
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
15
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
16
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
19
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
20
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
Daily Top 2Weekly Top 5

मनसे, भाजप कार्यालयात वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 01:16 IST

राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांत अनेक कार्यकर्ते होतेच; परंतु नेत्यांचे आगमन झाल्याने मनसेच्या कार्यालयात अनेक वर्षांत प्रथमच गर्दी झाली होती.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांमध्ये उत्साह । अन्य पक्ष कार्यालयांमध्ये जेमतेम हजेरी

नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांत अनेक कार्यकर्ते होतेच; परंतु नेत्यांचे आगमन झाल्याने मनसेच्या कार्यालयात अनेक वर्षांत प्रथमच गर्दी झाली होती. अन्य पक्षांच्या कार्यालयांमध्ये मात्र पूर्ण वेळ कर्मचारी अथवा कार्यकर्ते वगळता फारशी गर्दी नव्हती; मात्र सायंकाळनंतर अन्य पक्ष कार्यालयेदेखील गजबजली होती.
निवडणूक आयोगाने शनिवारी (दि.२१) विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतरही राज्यातील विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगे्रसच्या नाशिक शहर व जिल्हा कार्यालयातील गर्दी नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात कार्यालयीन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणाचीही उपस्थिती नसल्याचे दिसून आले. सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला गल्ली ते दिल्ली म्हणजेच महापालिकेपासून लोकसभेपर्यंत सत्ता मिळाल्याने ‘अच्छे दिन’ आलेल्या या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात कर्मचाऱ्यांसोबतच कार्यकर्ते अणि राज्यस्तरीय पदाधिकाºयांचीदेखील उपस्थिती दिसून आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गजबजलेल्या या कार्यालयात अजूनही पक्षचिन्ह व प्रचार साहित्याचा रखरखाव व नियोजन सुरू आहे, तर शिवसेनेच्या कार्यालयात नियमित काम करणारे कर्मचारी व कार्यकर्ते दिसून आले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतून बाहेर राहूनही लाखोंच्या सभा घेऊन संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय शनिवारी दिवसभर गजबजलेले होते. पक्ष विधानसभा निवडणूक लढविणार की नाही याविषयी साशंकता व्यक्त होत असताना पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे नाशिक जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये असल्यामुळे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात शहरासह संपूर्ण जिल्हाभरातील पदाधिकारी यांनी पक्षाच्या कार्यालयामध्ये गर्दी केली होती.
काँग्रेस कमिटीचे कुलूप उघडले
लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून पराभवाचा सामना करावा लागल्यापासून गलितगात्र झालेल्या काँग्रेसचे शहर व जिल्हा कार्यालय गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बंदच होते; परंतु निवडणुकीचे वेध लागल्याने पक्षाचे शहर व जिल्हा कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले आहे; मात्र याठिकाणी जिल्हा कार्यकारिणी अथवा शहर कार्यकारिणीसह कोणीही कार्यकर्ते अथवा नेते फिरकत नसल्याने येथील शुकशुकाट कायम आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसMNSमनसेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस