शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्टÑ चेंबरचा कश्कदार्य सरकारशी करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:25 IST

महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅॅग्रीकल्चर व कश्कदार्य प्रदेश, उझबेकिस्तानच्या राज्य सरकारबरोबर कश्कदार्य गुंतवणूक मंचावर व्यापार-उद्योगाच्या वाढीसाठी व विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

ठळक मुद्देउद्योग, व्यापार वाढीसाठी प्रयत्न

नाशिक : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅॅग्रीकल्चर व कश्कदार्य प्रदेश, उझबेकिस्तानच्या राज्य सरकारबरोबर कश्कदार्य गुंतवणूक मंचावर व्यापार-उद्योगाच्या वाढीसाठी व विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य कराराचा उद्देश दोन्ही देशांतील व्यापार उद्योग क्षेत्रांमधील व्यावसायिक संबंधांच्या विकासासाठी एक व्यावहारिक चौकट स्थापित करणे आणि परस्पर आर्थिक उद्दिष्टांच्या अंमलबजावणीस वाढविण्यासाठी सहकार्याच्या कार्यपद्धती निश्चित करणे हा आहे, अशी माहिती चेंबरच्या वतीने देण्यात आली आहे.महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा आणि कश्कदार्याचे राज्यपाल जफर रु झिये यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी व्यासपीठावर चेंबरचे विश्वस्त आशिष पेडणेकर, श्रीमती अलिशर अब्दुवालिएव, गुंतवणूक आणि परराष्ट्र व्यापार उपमंत्री ओयबिक शागाझातोव, कश्कदार्यचे उपराज्यपाल आणि के वांग तसेच कश्कदार्य प्रदेश सरकारचे वरिष्ठ सल्लागार उपस्थित होते.संतोष मंडलेचा यांनी, या सामंजस्य करारामुळे दोन्ही क्षेत्रांमधील व्यापार मजबूत होऊन व्यापार संबंधांच्या विकासासाठी एक व्यावहारिक चौकट स्थापित होईल, असा विश्वास व्यक्त केला. राज्यपाल जफर रुझिये यांनी महाराष्ट्र चेंबरच्या प्रतिनिधी मंडळाचे आभार मानले. महाराष्ट्र चेंबर आणि कश्कदार्य प्रदेश, उझबेकिस्तान येथे स्थित असलेल्या लघु, मध्यम उद्योगासमवेत व्यवसाय संधी शोधण्यासाठी बीटूबीच्या बैठका झाल्या. त्यातही सकारात्मक चर्चा झाली.याप्रसंगी सदस्य मनप्रीत नेगी, सुनीता फाल्गुणे, श्रीकृष्ण परब, ओमप्रकाश अग्रवाल, श्रीमती स्मिता मंडलेचा, श्रीमती दीपलक्ष्मी पेडणेकर, सुरेंद्र पाटील, राजेंद्र जाखडी, डॉ. शामसुंदर चौघुले, श्रीमती रेणु अग्रवाल, राधिका परब आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकbusinessव्यवसाय